नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांत चोरी आणि घरफोडीच्या तीन स्वतंत्र घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. हदगाव, वजिराबाद आणि भाग्यनगर या तीन भागांत झालेल्या या घटनांमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. पोलिसांनी तीनही प्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
हदगाव येथे घरफोडी
घरफोडीची पहिली घटना हदगाव येथील लक्ष्मीनारायण नगरात उघडकीस आली आहे. ज्ञानेश्वर परसराम इंगोले (वय ३५) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. १ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते २ जुलै रोजी सकाळी ११ या कालावधीत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि दोन कंपनीचे मोबाईल असा एकूण ७७,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. पीडिताच्या फिर्यादीवरून हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २०८/२०२६ (कलम ३०५(अ), ३३१(३)(४) भारतीय न्याय संहिता-२०२३) नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वजिराबाद येथे बॅग चोरी
दुसरी चोरीची घटना वजिराबाद येथील मामीडवार कृषी सेवा केंद्राजवळ घडली. २ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता अज्ञात चोरट्याने ताराबाई विरेंद्र आवुलवार (वय ६०) यांची बॅग चोरली, ज्यामध्ये १५,००० रुपये रोख होते. या प्रकरणी नांदेड (ग्रामीण) पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ३३३/२०२६ (कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता-२०२३) नोंदवण्यात आला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल साखरे तपास करत आहेत.
भाग्यनगर येथे ४ लाखांची चोरी
सर्वात मोठी चोरीची घटना भाग्यनगर परिसरातील शिवशक्ती कॉम्प्लेक्ससमोर मालेगाव रोडवर घडली. ३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता अज्ञात चोरट्याने सुजित भीमराव सिमराव सुरोसे (वय ३७) यांच्या बॅगेतील ४,००,००० रुपये रोख रक्कम चोरली. भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ३४६/२०२६ (कलम ३०५, ३१८(२) भारतीय न्याय संहिता-२०२३) दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले यांच्यावर या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, या सलग घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासणे आणि संशयितांची माहिती गोळा करणे सुरू केले असल्याचे सांगण्यात आले.