Pimpri Chinchwad Politics BJP Strength Rise Rahul Kalate Join Claim Win | पिंपरीत आम्ही 128 पैकी 125 जागा जिंकणार: भाजप आमदार शंकर जगतापांचा दावा, म्हणाले- राहुल कालाटेंच्या प्रवेशाने ताकद वाढली – Pune News



एकेकाळी अजित पवारांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजप आमदार शंकर जगताप यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला 128 पैकी 125 जागा मिळतील, असा दावा केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी

.

यापूर्वी आमदार शंकर जगताप यांनी भाजप 100 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांनी हा आकडा 125 वर नेला आहे. राहुल कलाटे यांनी यापूर्वी जगताप परिवाराविरोधात आक्रमक निवडणुका लढवल्या होत्या, मात्र आता तेच सोबत आल्याने भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. विशेष म्हणजे, उर्वरित तीन जागा अजित पवारांची राष्ट्रवादी जिंकणार का? या प्रश्नावर मात्र जगतापांनी सूचक मौन बाळगले.

कार्यकर्त्यांना न्यायाचे आश्वासन

नव्या नेत्यांच्या प्रवेशामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असण्याच्या शक्यतेवर बोलताना जगताप म्हणाले, भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींचा आदेश अंतिम असतो. आमच्या कार्यकर्त्यांवर कधीही अन्याय होऊ दिला जाणार नाही, आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्या त्या वेळी त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल. भाजपमध्ये सर्व्हेक्षण करूनच उमेदवारी दिली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?

एकडे भाजप विजयाचा दावा करत असतानाच, दुसरीकडे त्यांना रोखण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला असून, केवळ दोन जागांवरून चर्चा अडकली आहे. खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार हे सुलक्षणा शिलवंत आणि इम्रान शेख यांच्या जागांसाठी आग्रही असून, स्वतः शरद पवारांनी या जागा पदरात पाडून घेण्यासाठी विशेष लक्ष घातल्याचे समजते. येत्या एक-दोन दिवसांत पिंपरी-चिंचवडमधील महाआघाडीच्या युतीचे चित्र स्पष्ट होणार असून, भाजपच्या 125 च्या दाव्याला विरोधक कसे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *