I am talking about the municipal corporation…, CIDCO’s water issue corporators threw the baton, chaos started as soon as the mayor asked them to sit down because they raised a topic that was not in the agenda | मी महापालिका बोलतेय…: सिडकोच्या पाणीप्रश्नी नगरसेवकांनी राजदंड पळवला, विषयपत्रिकेत नसलेला विषय उपस्थित केल्याने महापौरांनी बसण्यास सांगताच गोंधळ सुरू – Chhatrapati Sambhajinagar News



आज मी सांगणार आहे, महापालिकेच्या सभागृहाची कहाणी. १९८८ ला पहिली निवडणूक झाली. नगरसेवकांची संख्या होती ६०. पण, कुणालाही खोटं वाटेल अशी परिस्थिती होती सभागृहाची. महापालिकेचं टाऊन हॉल सभागृह नादुरुस्त होतं. त्यामुळं पहिल्या सभा झाल्यात ते पोलिस आयुक्ताल

.

महापालिका सभा सुरू असताना महापौरांसमोर राजदंड ठेवलेला असतो. फार गोंधळ आणि गदारोळ झाला तरी सभेचे कामकाज महापौर चालवू शकतात. पण, राजदंड पळवला तर मात्र सभेचं कामकाज थांबतं. पहिले महापौर डॉ. शांताराम काळे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत तर बाजी मारली. मात्र, सभागृहातील गोंधळावर त्यांना काहीच उपाय सुचेना. त्यात शिवसेनेचे नगरसेवक खूपच आक्रमक. वंदे मातरम, उर्दूतील विषयपत्रिका संभाजीनगर नामांतर असे मुद्दे सभेत गाजत असताना कामकाज जवळपास होतच नसे. सर्वसाधारण गोंधळ आणि गदारोळाचे ‘अलंकार’ याच सभागृहात परिधान केले. पुढं ते अलंकार आजपर्यंत जतन केले ही किती मोठी कामगिरी.

टाऊन हॉलमधील एका सभेत सिडकोतील नगरसेवक मोतीराम घडामोडे यांनी पाणीप्रश्नावर चर्चा सुरू केली. विषयपत्रिकेत तो विषय नव्हताच. महापौर काळे यांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. तरीही शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. महापालिकेत सिडकोचे नगरसेवक असले तरी व्यवस्थापन सिडकोकडे होते. घडामोडे यांनी पाणीपुरवठ्याची जबाबदारी महापालिकेकडं घ्यावी, असा आग्रह धरला. प्रचंड गोंधळ सुरू झाला तरी कामकाज काही थांबेना. अखेर घडामोडे यांनी राजदंड पळवला. नारायण फतेलष्कर यांनी त्यांना मदत केली. ज्यांनी मतपेटीच पळवली त्यांना राजदंड पळवायला काय होतं, अशी टीका झाली. पण, घडामोडे आणि सिडकोतील नगरसेवकांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने जबाबदारी घ्यावी, असा आग्रह कायम ठेवला. थोडक्यात काय तर सिडकोच्या पाणीप्रश्नावर राजदंड पळवण्यास सुरुवात झाली आणि नंतर अनेकदा सभागृहात राजदंड पळवला जाऊ लागला. त्यानंतर प्रशासन आणि महापौर काळे यांनी सभा सुरू झाल्यानंतर राजदंडांसाठी सुरक्षा रक्षकच सभागृहात ठेवले. पूर्वी अधूनमधून दिसणारे हे सुरक्षा रक्षक आजही असतात. महापालिकेच्या सभेत वादविवादाला सुरुवात झाली की हे सुरक्षा रक्षक आधी राजदंडजवळ येऊन थांबतात. म्हणजे थांबायचे. पुढंही हे असेच चालू राहिले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *