११ कोटी ८५ लाखांचा जमीन फसवणुकीचा खेळ!एकाच जमिनीच्या बनावट सौदाचिठ्ठ्या; ३५ हून अधिक जणांना गंडा

[ads1]

मुख्य आरोपी राहुल गायकवाडची पोलीस कोठडी वाढली 

नांदेड (प्रतिनिधी) – जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या नावाखाली बनावट सौदाचिठ्ठ्या आणि दस्तऐवज तयार करून तब्बल ११ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल नागोराव गायकवाड (वय ३८, रा. शिवरायनगर, नांदेड) याला वजीराबाद पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाची सुरुवात ३५ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारीपासून झाली. नांदेड येथील देवेन्द्र शांतीलाल शर्मा (वय ३९) यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२६/२०२६ दाखल करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, मौजे मेंढला, ता. अर्धापूर येथील शेतजमिनीची खोटी सौदाचिठ्ठी तयार करून तक्रारदाराकडून ३५ लाख रुपये घेण्यात आले.

मात्र, तपास पुढे सरकताच या प्रकरणाचे धागेदोरे अनेक व्यक्तींपर्यंत पोहोचले. पोलिस तपासात आरोपीने एकाच जमिनीशी संबंधित बनावट कागदपत्रे व सौदाचिठ्ठ्या तयार करून ३५ हून अधिक व्यक्तींची तब्बल ११ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात विशाल गोविंदराव गायकवाड आणि माणिक उर्फ बाबु दत्ता सरोदे हे सहआरोपी निष्पन्न झाले असून ते फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. बनावट दस्तऐवजांच्या आधारे फसवणूक झालेल्या अन्य व्यक्तींचे व्यवहार आणि कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे.

या प्रकरणातील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, गजानन कदम आणि एकनाथ शिरसागर यांच्या पथकाने राहुल गायकवाडला न्यायालयात हजर केले. मुख्य न्यायदंडाधिकारी भाऊसाहेब मोरे यांनी आरोपीला १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.आज या प्रकरणातील तिसरा आरोपी अमोल अशोक रामराव माळेगावकर यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.तसेच दुसरा आरोपी जखाजी उर्फ बंडू धोंडजी पावडे  यास अगोदरच न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.  

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, बनावट दस्तऐवज कोणी तयार केले, आर्थिक व्यवहार कुठे झाले आणि फसवणुकीत आणखी किती जणांची रक्कम अडकली आहे, याचा सखोल तपास वजीराबाद पोलीस करीत आहेत.आज आरोपीच्या वतीने ऍड. ए,बी. शाहरुख आणि ऍड. शेख अजीम यांनी सादरीकरण केले.  

ज्या ३५ लोकांची फसवणूक झाली त्यातील काही जणांची नवे पुढील प्रमाणे आहेत.

  • चाकरलोड गंगारेड्डी
  • गजानन चंद्रकांत पंदीलवारप्रविण नारायणराव जोशी
  • सतिश सुगनचंदजी शर्माइंदरचंद हगमनलू
  • आझम सत्तार शेखमाधव तुकाराम हराळे
  • राजकुमार नारायण कुंटेनवनाथ रामनिवासजी दायमा
  • बालाजी मरीबा पेनुरकर
  • संघपाल मल्हारी भारेकैलास साहेबराव चौरे
  • सुधाकर मोहनराव बसवदे
  • सतीश सुगनचंदजी शर्मा
  • श्यामसुंदर सुखदेव सारडा
  • अमरसिंग देवराव आईलवारनिवृत्ती सोनसळे
  • सतीश मधुकर मुक्कावार

 


Post Views: 134










[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *