Udgir Anant Kadam Raosaheb Patil Sahitya Award Visit Photos | ‘चला कवितेच्या बनात’चा गौरव: उदगीरचे अनंत कदम यांना रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर – Maharashtra News



यंदाचा रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार उदगीरचे अनंत कदम यांना जाहीर केल्याची माहिती, साहित्यिक सुरेंद्र पाटील यांनी दिली. पाटील यांनी आपल्या वडिलांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केलाय. साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे साहित्यिक, संस्था किंवा व्य

.

पुरस्कारासाठी कसलीही प्रवेशिका मागवली जात नाही. विशेष म्हणजे पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या घरी जाऊन हा पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.

उदगीरचे अनंत कदम हे एक उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी वाचन चळवळीची गरज लक्षात घेऊन जून २०११ पासून ‘वाचक संवाद’ हा उपक्रम सुरू केला तो आजही समविचारी मित्रांना घेऊन अखंडपणे चालू आहे. आत्तापर्यंत ३५१ वक्त्यांनी त्यांच्या या उपक्रमात हजेरी लावलेली आहे. आतापर्यंत ३५१ पुस्तकांवर तितक्याच संवादकांनी ‘वाचक संवाद’मध्ये संवाद साधलेला आहे.

‘चला कवितेच्या बनात’ हा उपक्रमही ते राबवतात. या यशस्वी उपक्रमशीलतेमुळे त्यांची निवड केल्याचे सुरेंद्र पाटील यांनी सांगितले. येत्या जानेवारीमधे त्यांच्या घरी जाऊन अनंत कदम यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराने अनंत कदम यांच्या कार्याची दखल घेतल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. पहिला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार कथाकार सचिन वसंत पाटील यांच्या मायबोली रंग कथांचे या पुस्तकास मिळाला होता. सचिन पाटील यांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

संबंधित वृत्त

जिद्दी लेखकाचा सन्मान:सचिन पाटील यांच्या मायबोली रंग कथांचे पुस्तकाला पहिला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *