![]()
राजकीय निवडणुकीतील जय-पराजय हे पाचवीलाच पुजलेले असतात, मात्र कधी कधी एखाद्या उमेदवाराचा पराभव त्याच्या इतका जिव्हारी लागतो की, तो थेट सार्वजनिक नात्यालाच छेद देण्याचा प्रयत्न करतो. चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत असाच एक प्रकार समोर आला आहे. येथील काँग्रेस
.
सुधीर शिंदे हे चिपळूण शहराच्या राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. भाजी विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी मोठा लोकसंपर्क निर्माण केला होता. या जनसंपर्काचा फायदा घेत त्यांनी या निवडणुकीत मोठी मदार ठेवली होती. सुधीर शिंदे यांनी नगराध्यक्ष पदासह प्रभाग 12 मधून नगरसेवक पदासाठी नशीब आजमावले होते, तर त्यांच्या पत्नी सुजीता शिंदे यांना प्रभाग 11 मधून रिंगणात उतरवले होते. मात्र, मतदारांनी या पती-पत्नीला पूर्णपणे नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
काम चालू राहील, पण देणगी नाही!
निवडणुकीत मतदारांनी आपल्याला दगा दिल्याची भावना सुधीर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. “मी लोकांसाठी रात्रंदिवस धावलो, मदतीला धावून गेलो. मला ठाम विश्वास होता की जनता माझ्या पाठीशी उभी राहील, पण मतदारांनी मला नाकारले. मी हरलेलो नाही, माझे सामाजिक कार्य यापुढेही सुरूच राहील, पण आता मी कोणालाही वैयक्तिक देणगी देणार नाही,” अशा शब्दांत सुधीर शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला.
बलाबल आणि निकालाचे गणित
सुधीर शिंदे यांनी उमेदवारीसाठी राजकीय पक्षांच्या अनेक उड्या मारल्या होत्या. प्रथम शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या सुधीर शिंदे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे उमेदवारी मागितली होती, मात्र तिथे डावलले गेल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेसचा हात धरला. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत त्यांना अवघी 121 मते मिळाली, तर त्यांच्या पत्नीला तिसऱ्या क्रमांकाची 536 मते मिळाली. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतही ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. वर्षानुवर्षे सामाजिक कामात आघाडीवर असूनही मतदारांनी इतक्या मोठ्या फरकाने पराभूत केल्याने शिंदे व्यथित झाले आहेत.
हे ही वाचा…
महाराष्ट्रात महापालिका रणधुमाळीला प्रारंभ:अर्ज प्रक्रियेला सुरुवात, पण युतींचा अजूनही गोंधळ; तणाव शिगेला, राजकीय चित्र अजून धूसर
राज्यातील 29 महापालिकांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणुका 2026 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, आजपासून अधिकृतपणे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होऊन 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून, 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध असेल. 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी एकाच टप्प्यात मतदान घेतले जाईल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. अवघे 23 दिवस हातात असताना, राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, निवडणूक तयारीपेक्षा युती-आघाडीच्या गोंधळानेच अधिक चर्चा रंगत आहेत. सविस्तर वाचा…
