![]()
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १० मे १९२४ रोजी बार्शीच्या भूमीमध्ये ऐतिहासिक ‘मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषद’ झाली होती. या महान घटनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने, येत्या रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी बार्शीत शतको
.
या परिषदेचे नियोजन दोन महत्त्वपूर्ण सत्रांत करण्यात आले आहे. पहिले सत्र सकाळी १० ते १ या वेळेत ‘प्रांतिक बहिष्कृत परिषद’ या विषयावर आधारित असेल. याची सुरवात माजी मंत्री आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते होणार आहे. या सत्राचे अध्यक्षपद माजी प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे भूषवणार असून, मुख्य वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे मार्गदर्शन करणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. कृष्णा मस्तुद तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. बी. वाय. यादव व प्रशांत पैकेकर उपस्थित राहणार आहेत.
दुसरे सत्र दुपारी १ ते ५ या वेळेत बौद्ध धम्म परिषद म्हणून पार पडेल. याची सुरवात माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते होईल. या सत्राचे अध्यक्षपद पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो (छत्रपती संभाजीनगर) भूषवतील. या सत्रात विशेष आकर्षण म्हणून श्रीलंकेहून आलेले पूज्य भिक्खू यश थेरो व पूज्य भिक्खू गुणानंद थेरो यांची धम्मदेसना लाभणार आहे. त्यांच्यासोबतच भिक्खू सुमेधजी नागसेन, भिक्खू एन. धम्मानंद थेरो, भिक्खू धम्मबोधी थेरो, भिक्खू विनितधम्म आणि भिक्खू शासनसुरी हे देखील मार्गदर्शन करतील. प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, मातोश्री रमाई महिला मंडळ आणि बार्शीतील सर्व पुरोगामी व आंबेडकरी संघटनांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बार्शी शहर व तालुक्यातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विष्णू कांबळे, जगन्नाथ शिवशरण, डॉ. शशिकांत गायकवाड, टी. एस. मोरे, अशोक वाघमारे, डी. डी. मस्के, नागनाथ सोनवणे व सहकाऱ्यांनी केले आहे.
गायकवाड, वाघमारे, शिंदे यांना देणार मानपत्र या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून श्रावस्ती बुद्ध विहार परिसरात ‘अशोक स्तंभाचे लोकार्पण’ करण्यात येणार आहे. तसेच ‘समग्र विचार’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होईल. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दत्ता गायकवाड, योगिराज वाघमारे आणि सावळा (तात्या) शिंदे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वा. संगीत विशारद शंकर वाघमारे यांच्या सुरावलींनी होईल. शाहीर राजेश ननवरे आपल्या शाहिरीतून प्रबोधन करतील. संपूर्ण सोहळ्यासाठी उपस्थितांना भोजनाची व्यवस्था सावळा शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
