अधिकारी सुस्त:महान केंद्राचे उच्च क्षमतेचे उपसा संच बंद; पाणीपुरवठा विस्कळीत, पाच वेळा पत्रव्यवहार करुनही कोणतीच उपाययोजना नाही‎

[ads1]


महान महावितरणच्या मनमानी आणि निष्काळजीपणामुळे अकोला शहरावर भीषण पाणीसंकट ओढवले आहे. महान येथील जलशुद्धीकरण केंद्राला गेल्या महिन्याभरापासून अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने ६५ एमएलडी क्षमतेचे मुख्य उपसा पंप पूर्णपणे ठप्प झाले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वीज कंपनीचे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत असून, या कारभाराचा लाखो अकोलेकरांना फटका बसत असून, हंड्याभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहराची तहान भागवण्यासाठी महान येथील प्रकल्पात २५ एमएलडी क्षमतेचे तीन आणि ६५ एमएलडी क्षमतेचे सहा असे एकूण ९ उच्च क्षमतेचे उपसा पंप आहेत. महिन्याभरापूर्वीपर्य ंत ६५ एमएलडीचे तीन आणि २५ एमएलडीचा एक असे एकूण चार पंपांच्या साहाय्याने पूर्ण दाबाने शहराला अखंडित २४ तास पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, गेल्या महिन्याभरापासून महावितरणकडून महान केंद्राला आवश्यक दाबाने वीजपुरवठा उपलब्ध होत नाही. व्होल्टेज कमी राहत आहे. त्यामुळे तांत्रिक महानच्या याच जलशुद्धीकरण केंद्रास कमी दाबाने वीज पुरवठा होते आहे. असा होतो पाणीपुरवठा महान धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आणून तुरटी, क्लॅरिफायर आणि फिल्टर प्लांटद्वारे गाळमुक्त केले जाते. त्यानंतर ब्लिचिंग पावडर व क्लोरिन गॅसचा डोस देऊन शुद्ध पाणी टिटवा फाट्यावरील मुख्य जलकुंभात सोडले जाते. तेथून ६५ एमएलडी प्लांटद्वारे श्रद्धानगर, केशवनगरसह विविध भागातील जलकुंभांना पाणीपुरवठा होतो. “कमी व्होल्टेजमुळे ६५ एमएलडीचे तीन संच बंद “कमी व्होल्टेजमुळे ६५ एमएलडीचे तीन पंप सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे तीनच पंपांवर पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागत आहे. वीज वितरण कंपनीच्या सीईओंपासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंत महिनाभरात पाच वेळा लेखी विनंती केली; मात्र महावितरणने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. – आशिष भालेराव, अभियंता, जलशुद्धीकरण केंद्र, महान. परिणामी, पाणीपुरवठा यंत्रणेला नाइलाजास्तव ६५ एमएलडीचे केवळ दोन आणि २५ एमएलडीचा एक अशा अवघ्या तीनच पंपांवर कारभार चालवावा लागत आहे. यामुळे अकोला शहराला सध्या दररोज फक्त ६१.२ दशलक्ष लिटर इतकाच तोकडा पाणीपुरवठा होत असून पाण्याची मोठी तूट निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीबाबत महान जलशुद्धीकरण केंद्राकडून महावितरणच्या ग्रामीण कार्यकारी अभियंत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेल्या महिनाभरात तब्बल पाच वेळा लेखी पत्रव्यवहार करून करून त्यांच्यापुढे कैफियत मांडण्यात आली. मात्र, महावितरणने कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *