[ads1]
![]()
मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचा आज श्रीगोंदे तालुक्यात मुक्काम होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.संभाव्य गर्दी लक्षात घेऊन श्रीगोंदे शहर व तालुक्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.जरांगे पाटील बुधवारी रात्री श्रीगोंदे शहरातील बाजार तळ परिसरात दाखल होणार असून तेथे त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. बंदोबस्तात पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व पोलिस निरीक्षकांसह 50 अधिकारी, 350 पोलिस कर्मचारी, एसआरपीएफची एक तुकडी आणि दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी मंगळवारी सायंकाळी श्रीगोंद्यात भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली वदौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचना दिल्या. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी श्रीगोंद्यात येऊन तयारीचा आढावा घेतला होता. बाजार तळ परिसरात मराठा बांधवांकडून स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा समाजाकडून सुरू असलेली तयारी पाहता श्रीगोंद्यात आज राजकीय-सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे.प्रशासनासाठी गर्दीचा उत्साह कायम ठेवत कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हीच खरी कसोटी असेल.
[ads2]
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण:उपोषणात दौरा करणे सोपे नाही; आता पाटोद्यातूनच थेट मुंबईला जाण्याचा विचार- मनोज जरांगे
















Leave a Reply