The Shiva statue worth crores in Peshwa Park is in ruins. | पेशवे पार्कमधील कोट्यवधींची शिवसृष्टी धुळखात: भाजप आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात शिवसेनेचा निषेध – Pune News



पुणे महानगरपालिकेच्या पेशवे पार्कमधील कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली शिवसृष्टी धुळखात पडल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने शुक्रवारी तीव्र आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि इतिहासाचा अपमान करणाऱ्या भाजप व प्रशासकीय हलगर्जीपणाविरोधात

.

१२ हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या पुणे महानगरपालिकेने उभारलेली ही शिवसृष्टी सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे. प्रभागात भाजपचे तब्बल ५ नगरसेवक असतानाही शिवसृष्टीची ही दुरवस्था भाजपची शिवविचारांबाबतची उदासीनता दर्शवते, असे शिवसेनेने म्हटले आहे.

या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने पेशवे पार्क परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “शिवद्रोही भाजपचा निषेध असो”, “शिवसृष्टीचा अपमान सहन करणार नाही”, “प्रशासनाची दिरंगाई बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

या आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, गटनेते अशोक हरणावळ, उपशहरप्रमुख भारत कुंभारकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांच्यासह दिलीप पोमन, मुकुंद चव्हाण, राजू चव्हाण, गोविंद निंबाळकर, गणेश घोलप, रणजीत शिंदे, संदीप गायकवाड, संजय साळवी, सुरज लोखंडे, रमेश परदेशी, गजानन देशमुख, चंदन बेंडवाल, निलेश वाघमारे, राहुल शेडगे, संजय वाल्हेकर, ज्ञानेश्वर पोळ, गणेश पोकळे, निलेश आल्हाट, पुरुषोत्तम विटेकर, अमित पापल, जगदीश दिघे, नागेश खडके आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसृष्टीच्या दुरवस्थेस भाजप आणि महापालिका प्रशासन पूर्णतः जबाबदार असून, तात्काळ दुरुस्ती व देखभाल न झाल्यास शिवसेना अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मनपा प्रशासनाने याबाबत गंभीरपणे दखल घेतली नाही तर आणखी आक्रमक आंदोलन करण्यात येईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *