ज्येष्ठ पौर्णिमेने घेतला कवितेचा आवाज – VastavNEWSLive.com


सप्तरंगी साहित्य मंडळाची १०८ वी काव्यपौर्णिमा;अनेक कवी कवयित्रींचा मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद

 

नांदेड- येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा पौर्णिमेचे औचित्य साधून शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी काव्यपौर्णिमा या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. काव्यपौर्णिमा मालेतील ही १०८ वी काव्यपौर्णिमा कवी कवयित्रींच्या उत्स्फुर्त प्रतिसादात रंगली. ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने सहभागी कवी कवयित्रींनी ज्येष्ठ पौर्णिमेला आपल्या कवितेच्या शब्दांचा आवाज दिला. यावेळी ज्योती परांजपे, रुपाली वागरे वैद्य, ज्योती पतिंगराव, सिंधुताई दहिफळे, दत्ताहरी कदम, हरीश केंद्रे पाटील, उषाताई ठाकूर, अर्चना भद्रे, आत्तम गेंदे, डी. एन. मोरे खैरकेकर, भगवान आमलापुरे, राहुल जोंधळे, काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे आदींची उपस्थिती होती. 

 

ज्येष्ठ नीज पौर्णिमेनिमित्त आयोजित शहरात संपन्न झालेल्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमात ज्योती परांजपे यांनी अभंग काव्यप्रकारातील लोकराजा, दत्ताहरी कदम- वटवृक्ष, सिंधुताई दहिफळे- धो धो बरसल्या सरी, राहुल जोंधळे- पावसा, आत्तम गेंदे- गळाभेट घेऊ, डी. एन. मोरे खैरकेकर- गारवा, ज्योती पतिंगराव- तृतीयपंथी, रुपाली वागरे वैद्य- वेदोक्ताची ती ठिणगी, केंद्रे हरिष- एक झाड, उषाताई ठाकूर- कमी नाही कशाची, अर्चना भद्रे- धरती, भगवान आमलापुरे- यास मी पण अपवाद नाही यांनी एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर केल्या. या कवितांचे अनेकांनी रसग्रहण केले. काव्यपौर्णिमा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *