Ahilyanagar Bolhegaon Woman Murder Jewellery Greed | दागिन्यांच्या लोभापायी माणुसकीला काळिमा: चौघींनी मिळून केली 40 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या, पोलिसांकडून आरोपींना बेड्या – Ahilyanagar News



दागिन्यांच्या लोभापायी माणुसकीला काळिमा फासणारी घटना अहिल्यानगरच्या बोल्हेगाव परिसरात उघडकीस आली आहे. येथील 40 वर्षीय मनीषा शिंदे यांचा निर्घृण खून सराईत गुन्हेगारांनी नव्हे, तर चार तरुणींच्या टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म

.

बोल्हेगाव येथील मनीषा शिंदे यांची शुक्रवारी राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. तोफखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास चक्रे फिरवली. तपासाअंती समोर आलेल्या माहितीने पोलिसही चक्रावून गेले. मयत मनीषा यांच्या शेजारी माहेर असलेली दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (वय 20) ही या कटाची मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. दिव्याला मनीषा यांच्याकडे असलेल्या दागिन्यांची माहिती होती. याच माहितीचा फायदा घेत तिने अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना सोबत घेऊन चोरीचा कट रचला.

ठरल्याप्रमाणे या चौघींनी मनीषा यांच्या घरात घुसून जबरदस्तीने दागिने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनीषा यांनी आरडाओरड करून प्रतिकार करताच, आरोपींनी त्यांच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. यात मनीषा यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या चौघींनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मजुरीचे 500 रुपये मागितल्याने मजुराला लोखंडी नळीने बेदम मारहाण

दिवसभर राबून केलेल्या कामाची मजुरी मागितल्याच्या रागातून एका मजुराला जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी नळीने बेदम मारहाण केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथे हा संतापजनक प्रकार घडला असून, याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटवा गवाले (रा. कोल्हा, ता. मुदखेड) हे गावातीलच लक्ष्मण काळे यांच्या शेतात ऊस लागवडीच्या कामासाठी गेले होते. काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गवाले हे आपली ठरलेली मजुरी, म्हणजेच 500 रुपये मागण्यासाठी काळे यांच्याकडे गेले. मात्र, पैसे देण्याऐवजी लक्ष्मण काळे यांनी कशाचे पैसे? असे म्हणत गवाले यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन काळे यांनी गवाले यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि लोखंडी नळीने त्यांच्या पाठीवर जोरदार प्रहार केले. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *