[ads1]
![]()
नागपूरमध्ये ओयो हॉटेल आणि रूम बुकिंग सेवांबाबत पोलिसांनी नवीन नियमावली तयार केली आहे. याबाबत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तयार केलेल्या नियमावलीचे त्यांनी स्वागत केले. बावनकुळे म्हणाले की, ओयो हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांची नोंद ठेवणे आवश्यक असेल. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज किमान 90 दिवस जतन करावे लागणार आहे. नागपूरमध्ये अनेक हॉटेल्सवर ओयोचे बोर्ड लावलेले आहेत. त्यामुळे या हॉटेल्सची तपासणी करून ओयोची सेवा कोणत्या कारणासाठी वापरली जात आहे, याचीही पाहणी केली जाणार आहे. ओयो हॉटेल्सवर आता पोलिसांचे लक्ष राहणार असून, शहराची सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. ही नियमावली पुढे संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. मुंबईतील मराठा आंदोलनावर बावनकुळे काय म्हणाले? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मुंबईकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व आंदोलकांना मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.सणासुदीच्या काळात मुंबईत मोठे आंदोलन करणे राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे आंदोलकांनी याचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मकपणे काम करत आहे. ओबीसी किंवा मराठा समाजापैकी कोणाच्याही हक्कावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र, सरकारला यावर काम करण्यासाठी काही वेळ द्यावा, असेही बावनकुळे यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीवर सरकारचे लक्ष राज्यात अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असल्याने सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत कशी पोहोचवता येईल, याबाबत सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आधार देणे आणि आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर सरकारचे लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. हेही वाचा…. मनोज जरांगे पाटील यांच्या 15 पैकी 12 मागण्या मान्य:धुळ्यात उदय सामंत यांची मोठे वक्तव्य, पक्षांतर्गत गटबाजीवरही दिले कडक निर्देश मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने राज्यात वातावरण तापले असताना, राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी मोठी माहिती दिली आहे. “सरकार जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या मान्य करत असून, त्यांच्या 15 पैकी 12 मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत,” असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले. धुळे येथे आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषद आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर वाचा..
[ads2]
कायदा-सुव्यवस्था राखणे सर्वांची जबाबदारी:OYOच्या नियमावलीपासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनापर्यंत; चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
















Leave a Reply