![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वेगवेगळे लढणार असल्याची घोषणा करताच शहरात भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईत काँग्रेस आणि मनसेचे विळ्या-भोपळ्याचे नाते असले, तरी प
.
राज्य निवडणूक आयोगाने २९ महानगपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला मनसे आणि महादेव जानकर यांच्या ‘रासप’चे नेतेही उपस्थित होते. “भाजपचा पराभव करण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्या आघाडीत आली तरी आमची हरकत नाही,” अशी उघड भूमिका घेत या नेत्यांनी अजित पवार गटालाही मविआत येण्याचे आमंत्रण धाडले आहे.
पवार काका-पुतणे एकत्र येणार?
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्याचे संकेत दिले असतानाच, दुसरीकडे अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये गुप्त खलबते सुरू झाली आहेत. अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटाच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटल्यानंतर स्थानिक पातळीवर दोन्ही गटातील नेत्यांची चर्चेसाठी एकत्रित येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सुप्रिया सुळेंचा फोन आणि मतविभाजन
या भेटीबाबत माहिती देताना नाना काटे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वी मला सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता. पिंपरी-चिंचवडमध्ये मतविभाजन टाळण्यासाठी शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करा, असा सल्ला त्यांनी दिला होता.” वरिष्ठांच्या आदेशानुसारच ही बैठक झाल्याचे काटे आणि गव्हाणे यांनी स्पष्ट केले आहे.
चिन्हाचा तिढा आणि रणनीती
या बैठकीत भाजपविरोधी लढण्यासाठी कोणते समीकरण जुळवायचे, यावर चर्चा झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ‘तुतारी’वर लढणार की ‘घड्याळ’ चिन्हावर? तसेच केवळ दोन्ही राष्ट्रवादींची युती करायची की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही सोबत घ्यायचे? भाजप विरोधी लढण्यासाठी यातील कोणते समीकरण अंतिम करायचे? या मुद्द्यांवर खल झाला.
हे ही वाचा..
पुणे-पिंपरीत सत्ता आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार:फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवारांनीही भाजपविरोधात ठोकला शड्डू
आगामी महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘एकला चलो रे’ची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शड्डू ठोकलाअसून, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आणण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे,” असा एल्गार पुकारला आहे. सविस्तर वाचा..
25 वर्षे मुंबई लुटली म्हणता, तेव्हा तुम्ही कुठे होता?:महापौर आमचा असताना उपमहापौर तुमचा होता, अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार
राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “आम्ही मुंबई लुटली असा आरोप करणाऱ्या भाजपने 25 वर्षे उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे चेअरमनपद भोगले. तेव्हा लुटताना तुम्ही कुठे होतात?” असा तिखट सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा..
