![]()
संजय राऊत यांच्याकडे मुंबईबद्दल बोलण्यासाठी काही मुद्दे नाहीत. त्यांना विकसित मुंबईचा प्लॅन काय आहे माहिती नाही. त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही म्हणून ते केवळ टीका करतात असे असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर शिवसेनेचे नेते गु
.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यस्तरावर मनपा निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मनात किंतू परंतु ठेवण्यात काही अर्थ नाही. अजित पवार यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा त्यांनी निवडणूक कशी जिंकायची निवडणुकीमध्ये यश-अपयश जे येईल ते येईल पण निवडणूक तत्त्वावर लढावी लागते. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा संपूर्ण अधिकार आहे, त्यांनी कशी निवडणूक लढवायची हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्यांच्यावर मी बोलणे योग्य नाही.
महायुतीला जनतेची पसंती
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मनपाच्या निवडणुकीत आम्हाला 51 टक्के मते घेऊन जिंकायचे आहे. आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्रात निवडून येऊ जनतेची पसंती ही महायुतीला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होईल असे वाटते आहे तर आम्हाला भाजपचा महापौर होईल असे वाटते आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडची जनता ठरवेल की कोणाचा झेंडा मनपावर असणार.
आदित्य ठाकरेंनी संधीचे सोनं करावे
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच वेळी त्यांनी आपल्या मुलाला पुढे आणले होते. वडील मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्री केले म्हणजे तुम्ही त्याला प्रमोटच केले होते. ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे काम करत आहेत त्यांना संधी आहे त्यांनी संधीचे सोनं करावे हेच आमचे म्हणणे आहे.
अधिकाऱ्यांना बॅनर-पोस्टर काढण्याची गर पडू नये
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लावली त्यावेळी आम्ही सर्वांनी पोस्टर काढले. ज्यांनी काढले नाही त्यावर कारवाई झाली असेल. आम्हाला तेवढी शिस्त आहे. निवडणूक आयोग- जिल्हाधिकाऱ्यांना बॅनर-पोस्टर काढण्याची गर पडू नये ही खबरदारी पक्षाच्या नेतृत्वाने घेतली पाहिजे. आचारसंहिता लागताच आम्ही आमचे सर्व बॅनर काढून घेतल्याने आमच्यावर कारवाई झाली नाही ज्यांनी बॅनर ठेवले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असेल.
