Municipal Election Voter List Criticism Balasaheb Thorat | मतदार यादीतील दुबार नावांवरून काँग्रेस आक्रमक: हा निवडणुकीचा पोरखेळ, बाळासाहेब थोरातांचा आयोगावर हल्लाबोल – Ahilyanagar News



राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानंतर मतदार यादीवरून राज्य निवडणूक आयोगावर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी जशीच्या तशी स्वीकारणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण

.

बाळासाहेब थोरात यांनी 10 टक्के गोंधळ जरी असला तरी त्यामुळे किती मतदार वाढले असा सवाल उपस्थित करत डिजिटल युगात दुबार नावे स्पष्टपणे दिसत असतानाही त्यात बदल न होणे म्हणजे कुठल्यातरी रिमोट कंट्रोल खाली निवडणूक प्रक्रिया चालवली जात असल्याचा संशय व्यक्त केला. थोरात म्हणाले, निवडणूक आयोग जे करत आहेत ते निवडणुकीचा पोरखेळ आहे. ब्राझील मॉडेलचा उल्लेख वारंवार केला जातो, मग त्याची अंमलबजावणी किती वेळा केवळ स्टार केले जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार

या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल. मुंबईत 10, 111 मतदान केंद्र असतील, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यातील मुदत संपलेल्या 27 महानगरपालिका तसेच नव्याने निर्माण झालेल्या जालना आणि इचलकरंजी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज घोषणा केली. निवडणूक रणधुमाळी 23 डिसेंबरपासून सुरू होणार असून 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.

भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसशी सामना- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुती या निवडणुका एकत्र लढणार की स्वबळावर, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल, काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल, एखाद दोन ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी युती देखील होईल. आता पुण्यात मात्र अजित पवार आणि आमची चर्चा झाली आहे, भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीने पुण्याचा विकास केला आहे, त्यामुळे कदाचित पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने लढताना तुम्हाला दिसेल. परंतु, ही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *