Lionel Messi India Tour Project Mahadev Inauguration | वानखेडेवर दुमदुमला सचिन.. सचिन.. नावाचा जयघोष: मेस्सी आणि मास्टर ब्लास्टर तेंडुलकरच्या भेटीने उत्साह द्विगुणित; मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केले मनोगत – Mumbai News

अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारतात 3 दिवसांच्या ‘GOAT इंडिया’ दौऱ्यावर आहे. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टा

.

यावेळी प्रोजेक्ट महदेवाचे उद्घाटन मेस्सी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अनेक वर्षांनी पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियममध्ये सचिन.. सचिन.. सचिन आवाज पुन्हा एकदा दुमदुमला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील यावेळी उपस्थित होते. सचिन तेंडुलकरने यावेळी मेस्सीसोबत हस्तांदोलन करत त्यांची जर्सी मेस्सीला भेट दिली. हा क्षण अनेक क्रिकेट चाहते आणि फुटबॉल चाहत्यांनी आपल्या डोळ्यात तसेच कॅमेऱ्यात कैद केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ‘गणपती बाप्पा मोरया’ने आपल्या प्रतिक्रियाला सुरुवात केली. ते म्हणाले, महान खेळाडू मेस्सीचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की तो आमच्या 60 मुलांना मार्गदर्शन करत आहे, जे 2024 मध्ये फुटबॉलच्या मैदानात आपले वर्चस्व गाजवणार आहेत. ‘प्रोजेक्ट महादेवा’चा उद्देश आपल्या राज्यात फुटबॉलला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणणे हा आहे आणि आमच्या 60 मुलांना मार्गदर्शन केल्याबद्दल मेस्सी, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही त्यांना प्रेरणा दिली आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की, त्यापैकी एक खेळाडू तुम्हाला फिफा विश्वचषकात खेळताना दिसेल.

दरम्यान, या कार्यक्रमाला क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, अभिनेता अजय देवगण, अमृता फडणवीस, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे आणि इतर अनेक दिग्गज उपस्थित होते. अमृता फडणवीस यांनी मेस्सीसोबत एक सेल्फीदेखील काढला.

लिओनेल मेस्सी-देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन

अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारतात 3 दिवसांच्या ‘GOAT इंडिया’ दौऱ्यावर आहे. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *