Hadapsar Hospital Violence Attack Doctors IMA Condemns Seeks Action | हडपसर सह्याद्री रुग्णालयावर हल्ला; डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर मारहाण: आयएमए पुणेने तीव्र निषेध करत कठोर कारवाईची केली मागणी – Pune News



पुण्यातील हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एका रुग्णाच्या निधनानंतर काही व्यक्तींनी तोडफोड करत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) पुणे शाखेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हिंसाचारामुळे रु

.

रुग्णालय प्रशासन आणि आयएमएने दिलेल्या माहितीनुसार, गंभीर अवस्थेतील रुग्णावर सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) सुरू असतानाच काही नातेवाईक आणि बाहेरील लोक जमावाने रुग्णालयात घुसले. त्यांनी आरडाओरड करत डॉक्टरांना मारहाण केली, वैद्यकीय उपकरणे फोडली आणि रुग्णालयात दहशत निर्माण केली.

आयएमए पुणेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील आणि सचिव डॉ. अभिजित सोन्नवणे यांनी सांगितले की, सीपीआर ही जीव वाचवणारी शास्त्रोक्त पद्धत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांच्या अशा अज्ञानामुळे डॉक्टर भविष्यात सीपीआर देण्यास घाबरतील, ज्याचा थेट परिणाम हजारो रुग्णांच्या जीवावर होईल. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत रुग्णालय किंवा डॉक्टरांची कोणतीही चूक दिसत नाही.

आयएमएने या घटनेचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्र मेडीकेअर ऍक्ट-२०१० अंतर्गत त्वरित आणि कठोर कारवाई करणे, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कार्यवाही करणे, सर्व रुग्णालय परिसर ‘सेफ झोन’ घोषित करणे आणि रुग्णालयांमध्ये २४ तास पोलीस संरक्षण व तात्काळ हस्तक्षेप यंत्रणा उभी करणे यांचा समावेश आहे.

डॉक्टर समाजाने यापुढे अशा हिंसाचाराविरुद्ध एकजूट दाखवत कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला आहे. डॉक्टर हे समाजाला अत्यावश्यक सेवा देत असून, त्यांच्यावर असे हल्ले होणे आणि रुग्णालयाची तोडफोड करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *