[ads1]
स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड यांच्या वतीने, महाराष्ट्र पोलीस यांच्या सहकार्याने ; उद्या डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात विनामूल्य प्रयोग
नांदेड (प्रतिनिधी) – आदिवासींचा ब्रिटिशांविरुद्धचा संघर्ष तसेच देशविरोधी शक्तींविरुद्ध त्यांनी केलेल्या संघर्षाची प्रभावी कथानक असलेले ‘जंगोम’ या नाटकाचा विशेष प्रयोग नांदेडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड यांच्या आयोजनातून, महाराष्ट्र पोलीस आणि डॉ. दंदे फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा प्रयोग होणार आहे. हेमेंदू रंगभूमी, नागपूर प्रस्तुत या नाटकातून इतिहास, संघर्ष आणि सामाजिक वास्तव यांचा नाट्यमय आविष्कार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
उद्या शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे जंगोम या नाटकाचा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रयोगासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. जंगोम या नाटकाच्या माध्यमातून आदिवासी समाजाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभारलेला संघर्ष आणि देशविरोधी शक्तींविरुद्धचा लढा नाट्यमय पद्धतीने मांडण्यात आला आहे. जंगल, आदिवासी जीवन, संघर्ष, अन्यायाविरुद्धचा प्रतिकार आणि सामाजिक वास्तव या विविध पैलूंना नाटकाच्या कथानकातून स्पर्श करण्यात आला असून, या विषयाची मांडणी प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी ठरणार आहे.
नाटकाचे लेखक प्रवीण पांडुरंगशोभा खापरे असून दिग्दर्शन शुभम निकम यांनी केले आहे. हेमेंदू रंगभूमी, नागपूरच्या माध्यमातून हा प्रयोग नांदेडच्या रसिकांसमोर सादर केला जाणार आहे. नाट्यप्रयोगासाठी प्रवेश विनामूल्य असल्याने नांदेड शहरासह परिसरातील नाट्यरसिक, विद्यार्थी, कलाप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलावंतांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महाराष्ट्र पोलीस आणि स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेडचे अध्यक्ष दिनेश कवडे यांनी केले आहे.

Post Views: 135
[ads2]
















Leave a Reply