नांदेडकरांसाठी मोठी आनंदाची बातमी! मुंबई-नांदेड-मुंबई विमानसेवा २५ डिसेंबरपासून सुरू

नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, वाशिम तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी ही अत्यंत खुशखबर! अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली मुंबई–नांदेड–मुंबई विमानसेवा येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. स्टार एअर कंपनीने यासाठी बुकिंगची प्रक्रिया त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सुरू केली आहे.

ही सेवा यापूर्वी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे उड्डाणाला विलंब झाला होता.

✈️ आठवड्यात तीन दिवस सेवा

प्रारंभी ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी चालेल. लवकरच ही सेवा दररोज उपलब्ध करण्याची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.

नांदेड-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहनजी नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांचे विशेष सहकार्य लाभले असून, स्थानिक जनप्रतिनिधींनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या नवीन विमानसेवेने नांदेड आणि मुंबईमधील प्रवास जलद, सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. शहराच्या प्रगतीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *