1200 लोकसंख्येच्या कापशीत 2800 झाडांचे ऑक्सिजन पार्क:सोशल मीडियावरील मेसेज ठरले प्रेरणादायी; गावात 3 एकरात करण्यात आली देशी झाडांची लागवड‎

0
transfar_240_17805663426a2149463d9a7_trees.jpg


.

‘भविष्यात शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळणार नाही’ अशा सोशल मीडियावरील केवळ चिंताजनक चर्चांवर न थांबता, जिल्ह्यातील कापशी गावाने प्रत्यक्ष कृतीतून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. अवघी १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल २८०० देशी झाडांचा ‘ऑक्सिजन पार्क’ साकारण्यात आला आहे.

ग्लोबल वॉर्मिंग आणि ४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणाऱ्या कडक उन्हाळ्याच्या काळात ग्रामस्थांनी एकत्र येत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कापशी गावात इंग्रजकालीन मोठा नैसर्गिक तलाव आहे. या तलावाच्या पायथ्याशी असलेल्या सुमारे ३ एकर गायरान आणि मोकळ्या जागेचा वापर या प्रकल्पासाठी करण्यात आला. दोन वेगवेगळ्या प्लॉटमध्ये ही लागवड उर्वरित पान ४ अतिक्रमणधारकांना फळबागेतून रोजगार गावातील आणखी अतिक्रमित जागेवर असाच ऑक्सिजन पार्क व फळबाग उभारली जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्या लोकांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले आहे, त्यांना तेथून न हटवता त्याच जागेवर देशी फळझाडे लावून दिली जातील. या झाडांपासून मिळणारे उत्पन्न त्याच लोकांच्या उदरनिर्वाहासाठी दिले जाईल. यामुळे अतिक्रमणही निघेल. कुटुंबांना रोजगार मिळेल. गावाला शुद्ध हवाही मिळेल. ^भावी पिढीला आपण काहीतरी देणे लागतो व त्यासाठी कायमस्वरुपी काम उभारण्याचा संकल्प करून तलावाच्या पायथ्याशी २८०० देशी झाडे लावली. झाडांशी मैत्री केल्याशिवाय आपल्याला शुद्ध हवा आणि पाणी मिळणार नाही. – विठ्ठलराव चतरकर, सरपंच, कापशी. {क्षेत्र- 3 एकर {झाडांतील अंतर 10X10 {एकूण झाडे 2800 {एकूण खर्च- 20 लाख {झाडांचे वय 2 वर्षे (उंची 8 फूट)

वृक्षलागवड एका नजरेत

भावी पिढीसाठी उभारणी; झाडांशी मैत्री केल्याशिवाय शुद्ध हवा नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *