[ads1]
मुक्रमाबाद (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मुक्रामाबाद पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितांविरुद्ध कारवाई करत जनावरे व वाहने जप्त केली आहेत.
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी मुक्रमाबाद पोलिसांना कत्तलीसाठी गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लखमापूर फाटा जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. यावेळी संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये जनावराची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या कारवाईत पंकज बालाजी चव्हाण, (वय 36 वर्षे, रा. सन्मुखवाडी) 2) गफुर शादल साहब शेख, वय 45 वर्षे (रा. मुखेड) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत मुक्रमाबाद पोलिसांनी MH-26-BE-4010 क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअपमधून वाहतूक करण्यात येत असलेली सात जनावरे ताब्यात घेतली. या जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये, तर वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्रमाबाद पोलिसांनी केली. कारवाईत सपोउपनि मठपती, पिटलावार यांच्यासह पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. गोवंशाची अवैध किंवा क्रूरपणे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Post Views: 361
[ads2]
















Leave a Reply