आशा भोसले यांचं शेवटचं गाणं रिलीज:‘ए मेरी जिंदगी…’चा सुरेल आवाज पुन्हा घुमला, VIDEO पाहून चाहते भावूक

मनोरंजन

[ads1]


ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या आवाजाची जादू आजही संगीतप्रेमींच्या मनावर कायम आहे. 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला होता. आता त्यांच्या 93व्या जयंतीनिमित्त आशा भोसले यांनी रेकॉर्ड केलेलं शेवटचं चित्रपटगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘ए मेरी जिंदगी, तू छुपी है कहाँ’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं ‘ओम का हरि’ या आगामी चित्रपटात आहे. आशा भोसले यांचं शेवटचं गाणं रिलीज आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त ‘ओम का हरि’च्या निर्मात्यांनी त्यांचं शेवटचं चित्रपटगीत रिलीज केलं. या गाण्यासोबत एक खास व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आशा भोसले स्टुडिओमध्ये गाण्याचं रेकॉर्डिंग करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, हा केवळ गाण्याचा व्हिडिओ नसून आशा ताईंच्या रेकॉर्डिंगच्या आठवणीही त्यात पाहायला मिळतात. रेकॉर्डिंगदरम्यान त्या चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते अंशुमन झा यांच्याशी संवाद साधताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर समोर आलेला हा व्हिडिओ चाहत्यांसाठी भावूक करणारा ठरत आहे. 2023 मध्ये झालं होतं गाण्याचं रेकॉर्डिंग ‘ए मेरी जिंदगी, तू छुपी है कहाँ’ या गाण्याचं रेकॉर्डिंग 2023 मध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी आशा भोसले 90 वर्षांहून अधिक वयाच्या होत्या. इतक्या वयातही त्यांच्या आवाजातील ताकद आणि गोडवा कायम असल्याचं या गाण्यातून पुन्हा एकदा जाणवतं.आशा भोसले यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. हिंदी चित्रपटसृष्टीपासून ते मराठी आणि इतर भारतीय भाषांपर्यंत त्यांच्या आवाजाने संगीतविश्वावर वेगळी छाप सोडली. त्यामुळे त्यांचं हे शेवटचं चित्रपटगीत त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष ठरलं आहे. ‘ओम का हरि’ची कथा काय? ‘ओम का हरि’ हा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित ड्रामा-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हरीश व्यास यांनी केलं आहे. चित्रपटात अंशुमन झा, रघुवीर यादव आणि सोनी राजदान यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट 18 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक म्हणाले… आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं शेवटचं गाणं प्रदर्शित करणं ही निर्मात्यांसाठी आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी खास भावना असल्याचं दिग्दर्शक हरीश व्यास यांनी म्हटलं आहे. आशा भोसले यांच्या आवाजाला आणि त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना ही एक आदरांजली असल्याची भावना चित्रपटाच्या टीमने व्यक्त केली आहे. चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आशा भोसले यांना स्टुडिओमध्ये गाताना पाहण्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. पडद्यामागील या दृश्यांमध्ये आशा ताईंचा उत्साह आणि गाण्याबद्दलची त्यांची आपुलकी पाहायला मिळते. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचा आवाज मात्र कायम जिवंत राहणार आहे. ‘ए मेरी जिंदगी, तू छुपी है कहाँ’ हे त्यांचं शेवटचं चित्रपटगीत त्यांच्या चाहत्यांसाठी एका सुंदर आणि भावूक आठवणीसारखं कायम स्मरणात राहणार आहे. हेही वाचा.. उत्सव लोकांसाठी, त्रास देण्यासाठी नव्हे!:डीजे, पेपरफुटीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल; पक्षचिन्ह खटल्यावर भाष्य गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर उत्सवांमध्ये वाढणारा ध्वनिप्रदूषणाचा त्रास, डीजेचा वापर, अश्लील नृत्य, एमपीएससी परीक्षांमधील गोंधळ, मराठा आरक्षण, पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद, तसेच राज्यातील राजकीय परिस्थिती अशा विविध मुद्द्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. उत्सव हे जनतेच्या आनंदासाठी असावेत, त्यातून नागरिकांना त्रास होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. सविस्तर वाचा..

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *