विधान परिषद निवडणुकीत आता 3 उमेदवार; अमरनाथ राजूरकर, कृष्णा आष्टीकर, प्रशांत इंगोले
नांदेड(प्रतिनिधी)- विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भाने निवडणुकीच्या रिंंगणात तीन उमेदवार शिल्लक राहिली आहेत. आज पाच जणांनी आपली नावे परत घेतली. एकूण 8 जणांनी अर्ज भरला होता. या निवडणुकीमध्ये एकूण 452 मतदार आहेत.
आज अर्ज परत घेणाऱ्यांमध्ये माधवराव निवृत्तीराव पवार, प्रविण प्रतापराव चिखलीकर, ज्योतीबा जयरामजी खराटे, पंकज माणिकराव गायकवाड आणि रामदास शिवराज पाटील यातील रामदास शिवराज पाटील हे कॉंगे्रसचे अधिकृत उमेदवार होते. आता निवडणुकीत तीन अर्ज शिल्लक राहिले आहेत. भाजपचे अमरनाथ राजूरकर, उध्दव ठाकरे गटाचे कृष्णा नागेश पाटील परंतू यांचे नामनिर्देशन अपक्ष असे आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. प्रशांत इंगोले यांचे नामनिर्देशन पत्र अपक्ष आहे.
या निवडणुकीत 452 मतदारांमध्ये भाजप-138, कॉंगे्र्रस-92, राष्ट्रवादी कॉंगे्रस-82, मजपा-39, शिवसेना शिंदे गट-23, एमआयएम-20, उध्दव सेना- 19, राष्ट्रवादी शरद पवार गट-13, वंचित बहुजन आघाडी-6 आणि अपक्ष 14 असे पक्षीय बलाबल आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर कॉंगे्रसच्यावतीने अधिकृत असे सांगितले की, आम्ही कृष्णा नागेश आष्टीकर यांना पाठींबा देत आहोत. परंतू निवडणुकीतील हालचाली करण्यामध्ये सर्वात वेगवान कार्य भारतीय जनता पार्टीच करते आणि त्यांचे प्रमुख नांदेड जिल्ह्यात खा.अशोक चव्हाण आहेत. त्यांच्या विरुध्द बाजूला खा.रविंद्र चव्हाण आहेत. पाहुया निवडणुकीत कोण-कोणते रंग भरले जातात आणि त्या रंगातून इंद्रधनुष्य कोणाचे तयार होते.
Post Views: 372
