कुऱ्हा पोलिसांचा माळेगावजवळ गावठी दारू अड्ड्यावर छापा:बोर नदीकाठी 84 हजारांचा मुद्देमाल नष्ट, आरोपीला अटक

0
2088e209-a269-4b4e-82b0-a5b0f616bcd4_1780585270154.jpg




कुऱ्हा पोलिसांनी माळेगाव परिसरातील बोर नदीच्या काठावर सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ८४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला असून, एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बोर नदीच्या काठी मोहा फुलाची हातभट्टी गुळ दारू गाळली जात होती. या माहितीच्या आधारे धाडसत्र राबवले असता, देविदास अवधूत उके (वय ४२, रा. माळेगाव) हा आरोपी घटनास्थळी मिळून आला. छाप्यादरम्यान, पोलिसांनी बेशरमाच्या झाडाझुडपीत लपवलेले ४८ पिपे मोहा सडवा आणि ३० लिटर हातभट्टी मोहा सडवा गुळ दारू जप्त केली. या जप्त केलेल्या दारू आणि सडव्याची एकूण किंमत ८४ हजार ३०० रुपये आहे, जो घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी आरोपी देविदास अवधूत उके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ सह कलम ६५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर, न्यायाधीशांच्या आदेशानुसार आरोपीला कारागृहात पाठवण्यात आले. सदरची कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल तुळजेवार, पोलीस उपनिरीक्षक विलास थुल, अंमलदार सपना निरगुळे, अनिल निघोट, सागर निमकर आणि शिपाई हेमंत डहाके यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *