देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार:एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ, तुम्ही संविधान अन् राष्ट्रप्रेमी नाही हेच यातून सिद्ध होतंय- संजय राऊत

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-06-04t10_1780550747.jpg




देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार आहे, त्या अनुषंगाने ते काम करत आहेत. एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ आहे, या देशात फक्त आमचाच पक्ष राहील, आमचाच पक्ष राज्य करेल. इतर कोणताच प्रादेशिक पक्ष राहणार नाही, या दृष्टीने शिवसेना फोडली, त्यासाठी यंत्रणेचा वापर केला, पासवान यांचा पक्ष तसाच फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा तेच सुरू आहे, पण हे लोकशाहीसाठी चांगले नाही, तुम्ही संविधान आणि राष्ट्रप्रेमी नाही हे त्यातून सिद्ध होत आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपने एका दिवसात राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली त्यांना लाज वाटली पाहिजे. नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे की ज्यांच्यावर आरोप केला त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळाली त्यांना लाज वाटली पाहिजे. ठेकेदारांना संधी देता त्यांनी काय सामाजिक कार्य केले? केवळ संपत्ती आहे म्हणून विधान परिषद दिली जात आहे. यापेक्षा राज्यसभा आणि विधान परिषद नसलेली बरी असे राऊतांनी म्हटले आहे. पैसा देणारा उमेदवार निवडून येणार संजय राऊत म्हणाले की, विधान परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक राहीली आहे का तर नाही. जो मतदार विकत घेऊ शकतो तोच ही निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे संकटमोचक असे काही राहिले नाही. मतदार दोघांकडून तिघांकडून पैसे घेतील. या निवडणुकीला काही अर्थ राहिलेला नाही. विधान परिषदेमध्ये अभ्यासू लोकं जात होते पण आता त्याचा कचरा डेपो झाला आहे असे म्हणावे लागेल. ही काही निकोप लोकशाहीचे लक्षण नाही. नाशिकमध्ये आमचा उमेदवार नाही, पण ही लढाई महायुतीमध्येच होणार आहे, ज्याचा भाव जास्त तो निवडून येईल. संकटमोचक यात काहीच करू शकत नाही. जो पैसा देणार तो निवडून देईल. कोणाला मतदान करायचे हे ठाकरे ठरवतील संजय राऊत म्हणाले की, नाशिक असो की इतर ठिकाणी मतदारांनी काय भूमिका घ्यायची हे उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर कळेल. मी विधान परिषदेच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मुद्दाम पडलो नाही. नाशिकमध्ये आमचे 58 एक मतदार आहे. इंडिया आघाडीची 8 तारखेला दिल्लीमध्ये बैठक आहे. त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी काँग्रेस नेत्यांची चर्चा सुद्धा झाली आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीत जात झुरळांना पाठिंबा द्यावा, आम्ही त्यांचे स्वागत करू. हे आंदोलन त्यांच्या पक्षाचे आहे त्यांचे राजकीय व्यासपीठ व्हायला नको. त्यांच्या देश वाचवण्यासाठी अशा चळवळी झाल्या पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *