[ads1]
![]()
जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक दिनी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करत, शासनाचा निषेध केला. जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव तथा जुन्या पेन्शन योजना समन्वय संघाचे राज्य समन्वयक महेंद्र हिंगे, राज्य समन्वयक सुनील भोर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील पंडित, आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, रमजान हवालदार, आप्पासाहेब जगताप उपस्थित होते. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या विनाअनुदानित अथवा अंशतः अनुदानित कायम आस्थापनेवरील नियमित वेतनश्रेणीतील तसेच त्यानंतर १०० टक्के अनुदान प्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. शिक्षक दिन साजरा केला जात असतानाच शिक्षकांनाच आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन करावे लागत असल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाविरोधात घोषणा देताना जिल्हाभरातील शिक्षक. शिक्षक दिन हा, शिक्षण क्षेत्रात महत्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी शिक्षकांप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली जाते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने, माध्यमिक शिक्षकांनी शाळेत उपस्थित झाले. काळ्या फिती लावूनच शिक्षक दिन त्यांनी साजरा केला. त्यानंतर ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमले. त्यामुळे शाळा न बुडवता, केलेले आंदोलन चर्चेत राहिले. आगामी विधानपरिषद निवडणुकीमध्ये शिक्षक, कर्मचारी, पदवीधर, विद्यार्थी व पालकांच्या माध्यमातून मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला. जुन्या सेवानिवृत्ती वेतन योजनेचे न्यायिक व हक्कदार असूनही शासनाकडून न्याय मिळत नसल्यास राज्यातील २६ हजार पेन्शनपीडित बांधवांना इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. शाळेत काळ्या फिती, मग आंदोलनात
[ads2]
सन्मानाच्या दिवशीच शिक्षकांचा ठिय्या:जुनी पेन्शन न मिळाल्यास 28 सप्टेंबरपासून मुंबईत ठिय्या आंदोलन
















Leave a Reply