एकनाथ शिंदे दिल्लीहून थेट दरे गावात:2 दिवसांच्या मुक्कामात नेमकं काय? विकासकामांचा आढावा, ग्रामस्थांशी संवाद, राजकीय हालचालींवरही नजर
![]()
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा आटोपल्यानंतर थेट सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळ गावी धाव घेतली आहे. मध्यरात्री दरेगावातील निवासस्थानी पोहोचले. शिंदे यांचा हा दोन दिवसांचा मुक्काम खाजगी स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील नियोजित कार्यक्रम पूर्ण करून शिंदे विशेष विमानाने पुण्यात दाखल झाले. त्यानंतर ते थेट दरेगावाकडे रवाना झाले. पुढील दोन दिवसांत ते गावातील आणि परिसरातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेणार आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच पर्यटनविकासाशी संबंधित प्रकल्पांची पाहणी त्यांच्या दौऱ्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विकासकामांचा सविस्तर आढावा घेणार
दरे आणि परिसरात समूह शेती तसेच जागतिक दर्जाचे पर्यटन प्रकल्प विकसित करण्यासाठी शासनाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत. या कामांची प्रगती तपासण्यासोबतच स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचाही त्यांचा कार्यक्रम आहे. शिंदे यांचे दरेगावाशी असलेले भावनिक नाते सर्वश्रुत असून, महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनंतर ते अनेकदा येथे मुक्काम करताना दिसतात. दरम्यान, राज्यात आगामी राजकीय हालचाली, विधानपरिषदेच्या निवडणुका आणि विविध राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे हा केवळ खाजगी दौरा आहे की त्यामागे काही मोठी राजकीय रणनीती दडली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चा आज पुण्यात एल्गार:दिल्लीतील आंदोलनानंतर आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार विद्यार्थी दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ आता पुण्यात आंदोलन करणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा
