अवैध गॅस सिलिंडर वाहतुकीवर कारवाई:5.92 लाखांचा मुद्देमाल जप्त; जायखेडा पाेलिसांत एका संशयितावर गुन्हा दाखल‎

0
app_17804118126a1eeda49e255_1001600794.jpg




जायखेडा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अवैधरित्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले. या कारवाईत वाहनासह सुमारे ५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सागर काळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अंतापूर चौफुली परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी पिकअप (एमएच १५ ईजी १४६१) संशयास्पदरीत्या आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये भारत, एचपी, इंडेन कंपनीचे व्यावसायिक गॅस सिलिंडर कोणताही वैध परवाना नसताना वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी चालक अंकुर बळीराम अहमदाबादकर (३५, रा. वडाळाभोई, ता. नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी वाहन व गॅस सिलिंडरसह एकूण ५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पुरवठा अधिकारी विनायक मेंढे यांच्या फिर्यादीवरून जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ आणि उपविभागीय पोलिस अधिकारी दर्शन दुगाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *