Acidity Causes | अ‍ॅसिडिटीचा त्रास वाढतोय? तर ‘या’ सवयी त्वरित बदला

0
Acidity-tips.webp.webp


Acidity Causes | सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित आहारामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. छातीत जळजळ होणे, पोटात अस्वस्थता जाणवणे किंवा अन्ननलिकेत आंबटपणा जाणवणे अशा तक्रारी अनेकांना सतावत आहेत. तज्ज्ञांच्या मते, रोजच्या काही चुकीच्या सवयी या त्रासाला कारणीभूत ठरत असून योग्य वेळी त्यात बदल करणे आवश्यक आहे. तर आता आपण अ‍ॅसिडिटीची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय याबाबत माहिती जाणून घेऊयात.

आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड (Hydrochloric Acid) नैसर्गिकरित्या तयार होत असते. हे अ‍ॅसिड अन्न पचनासाठी मदत करते, विविध एन्झाइम्स (Enzymes) सक्रिय करते आणि हानिकारक जीवाणूंना नष्ट करण्याचे काम करते. मात्र या अ‍ॅसिडचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढल्यास शरीरात अनेक त्रास सुरू होतात. छातीत जळजळ होणे, अ‍ॅसिड रिफ्लक्स (Acid Reflux), गॅस्ट्रायटिस (Gastritis) आणि पेप्टिक अल्सर (Peptic Ulcers) यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते, काही दैनंदिन सवयी अ‍ॅसिडिटी वाढवण्यासाठी थेट कारणीभूत ठरतात. वेळेवर जेवण न करणे किंवा रोज वेगवेगळ्या वेळेला आहार घेणे यामुळे पोटाचे नैसर्गिक चक्र बिघडते. तसेच अन्न व्यवस्थित न चावता घाईघाईने खाणे, एकाचवेळी खूप जेवणे आणि जेवल्यानंतर लगेच आडवे होणे यामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो. रात्री उशिरापर्यंत खाण्याची सवय, सततचा मानसिक ताण, दारू व तंबाखूचे सेवन तसेच तिखट, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे यामुळे पोटातील अ‍ॅसिडचे प्रमाण वाढून त्रास अधिक गंभीर होऊ शकतो.

Acidity Causes | घरगुती उपाय आणि योग्य दिनचर्या :

अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे उपाय उपयुक्त ठरू शकतात. कोमट पाणी किंवा दुधामध्ये एक चमचा गाईचे तूप मिसळून घेतल्यास पोटाला आराम मिळतो. अ‍ॅसिडिटीसोबत डोकेदुखी जाणवत असल्यास गुळाचा छोटा खडा खाल्ल्याने तात्पुरता दिलासा मिळू शकतो. सकाळी मऊ भात आणि गाईचे तूप खाणेही फायदेशीर मानले जाते. जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते आणि गॅसची समस्या कमी होते.

याशिवाय काही खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. आले, लसूण, गरम मसाला, शेंगदाणे आणि मेथी हे पदार्थ पित्त वाढवू शकतात. उन्हाळ्यात किंवा कडक उन्हात बाहेर पडताना डोके झाकण्यासाठी स्कार्फ किंवा कॅपचा वापर करावा. स्नॅक्स म्हणून मखाण्याचा पर्याय निवडता येतो, कारण तो हलका आणि सहज पचणारा असतो. दुपारी 3 ते संध्याकाळी 5 या वेळेत अंजीर आणि काळ्या मनुकांचे सेवन केल्यास पित्त शांत होण्यास मदत मिळते.

News Title: Acidity Causes And Easy Remedies

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed