काॅर्पोरेट जिहाद; मतीनसहघरमालक हनीफची चाैकशी:निदा खानने आश्रय घेतलेल्या घराचा मालक हनीफ म्हणाला, मतीनने घर कुणाला दिले माहिती नाही
![]()
काॅर्पोरेट जिहाद प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे अाश्रय दिल्याप्रकरणी साेमवारी पुन्हा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल व घरमालक हनीफ शेख यांची विशेष पथकाकडून तपासणी झाली. ‘मतीन भाई ने घर की चाबी मांगी थी, मुझे मालूम नहीं किसको घर दिया’ असा जबाब हनीफने दिला. मात्र त्याच्याच घरात निदा खानने वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला या प्रकरणात संशयित आराेपी करण्यात आले असून त्याच्याविराेधात गुन्हा दाखल झाला आहे. काॅर्पोरेट जिहाद प्रकरणात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आराेपपत्र दाखल झाल्यानंतर एसअायटीने या प्रकरणाचे राजकीय धागेदोरे उलगडण्यासाठी सोमवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात संभाजीनगरचा एमअायएम नगरसेवक मतीन पटेल, घरमालक हनीफ शेख या दोघांची दुसऱ्यांदा तब्बल ८ तास मॅरेथाॅन चौकशी झाली. यापूर्वी २५ मे राेजीही या दाेघांची १० तास चाैकशी झाली हाेती. तेव्हा मतीन पटेलचा माेबाईल फाेनदेखील एसआयटीने जप्त केला हाेता. त्यावेळी त्याने ‘बडे साब’ यांनी फाेन केल्याने आपण घर दिले, आपणही निदा खान काेण? हे ओळखत नसल्याचे सांगितले हाेते. चौकशीतील मुद्दे १) मतीन पटेलला हनिफकडून घराची चावी का मागितली होती?, निदा खान तिथे राहणार अाहे हे माहिती असूनही का लपवले?, शेख कडून चावी कधी घेतली?, निदाला चावी कधी दिली?, घर ताब्यात घेताना तिच्या सोबत कोण होते? हे प्रश्न विचारण्यात आले. २) हनीफ शेख याला निदाला घर देतांना चौकशी केली होती का?, घराची चावी का, कशी काेठे दिली? घराची चावी घेण्यास कोण अाले होते?, निदा खानला किती वेळा भेटला?, तिच्या नातेवाईकांच्या संपर्कात अजून आहे का?, मतीन पटेलला किती दिवसांपासून अोळखता? हे प्रश्न विचारण्यात आले. पुरवणी दोषारोपपत्रात नाव; स्पाॅट पंचनाम्यासाठी पथक संभाजीनगरला निदा खानला देण्यात आलेले घर हनिफ शेखचेच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर साेमवारी एसआयटीकडून त्याच्याविराेधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक हनिफला घेऊन संभाजीनगर येथे स्पाॅट पंचनामा करण्याकरीता रवाना झाले अाहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, मतीन पटेल या संशयितांविरोधात २२ मे रोजीच दोषारोपपत्र दाखल झाले आहे. यातील दानिश शेख, ताैसिफ अत्तार, निदा खान या तीन संशयितांच्या जामीन अर्जावर १२ जून रोजी सुनावणी अाहे. इनसाइड स्टाेरी – घरमालक सहअारोपी घरमालकाने पोलिसांना काही माहिती न देता वा अोळखपत्रांची शहानिशा न करता घर भाड्याने दिले. त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल असल्यास घरमालकाचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न होते. कारण गुन्हेगाराला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणे हा गुन्हा ठरतो. घरमालकाला बीएनएस २१६ अन्वये शिक्षेची तरतूद अाहे. त्याआधारे हनीफविराेधात गुन्हा दाखल झाला.
