निर्णयक्षमता गमावलेल्या आजच्या तरुण पिढीला भागवत ग्रंथ हाच मोठा आधार:ज्येष्ठ ब्रह्मचारी रेवतीनंदन दास यांचे निरुपण, श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात
![]()
आजची तरुण पिढी अनेक बाबतीत संभ्रमात असून आपली निर्णयक्षमता गमावून बसली आहे. अशा भरकटलेल्या युवकांना दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनात स्थैर्य आणण्यासाठी ‘श्रीमद् भागवत ग्रंथ’ हाच खरा मोठा आधार वाटतो, असे निरुपण ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यां
.
येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे चतुर्थ पुष्प गुंफताना ते बोलत होते. या सोहळ्यात सर्वश्री वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, अशोक कानडे, मदन कांबळे, डॉ. अंजली फाटके, मगन पटेल, राजू पटेल, मदन थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात आणि पुष्पवृष्टी करत ‘श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा’ साजरा करण्यात आला.
सोहळ्यादरम्यान इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्रीमान गिरीवरधारी दास यांनी अहिल्यानगर शहरासह देशभरात आणि जागतिक पातळीवर सुरू असलेल्या इस्कॉनच्या आंतरराष्ट्रीय कार्याची माहिती उपस्थितांना दिली. अध्यात्म आणि मानवी मूल्यांची जपणूक करण्यासाठी इस्कॉन सातत्याने कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कथेचे महत्त्व सांगताना श्रीमान रेवतीनंदन दास म्हणाले, अठरा पुराणे ऐकल्यावर जे पुण्य मिळते, ते एकट्या भागवत कथेच्या श्रवणाने प्राप्त होते. कलयुगावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की: कलीचा वास कुठे? मद्यपान, पशुहत्या-मांसाहार, व्यभिचार आणि जुगार या चार गोष्टींमध्ये कलयुगाचा वास असतो. भांडणे आणि दांभिकता ही कलीची मुख्य लक्षणे आहेत. जो मनुष्य नित्य-निरंतर कथा वाचन, श्रवण, पूजा आणि नामजप करतो, त्यावर कलयुगाचा कोणताही प्रभाव पडत नाही. भगवंताचे नाम आणि भगवंत यात काहीही अंतर नाही. पालकांना मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले, जे आई-वडील आपल्या मुलांना भगवंताची भक्ती शिकवत नाहीत, ते कर्तव्य विसरतात. आज लेकरांना टीव्हीवर फक्त ‘कार्टून’ दाखवले तर ती पुढे कार्टूनच बनतील, त्यामुळे त्यांना सुसंस्कारांची गरज आहे.
मुलगी साक्षात लक्ष्मी; ४२ पिढ्यांचा उद्धार आपण केलेल्या धर्मकार्याचा लाभ केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या पुढील पिढ्यांनाही होतो, असे सांगत त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा दाखला दिला. मुलगा भक्त झाला तर २१ पिढ्यांचा उद्धार करतो, पण मुलगी भक्त झाली तर ती साक्षात लक्ष्मीच्या रूपाने माहेर आणि सासर अशा ४२ पिढ्यांचा उद्धार करते, असे ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास म्हणाले.
