विधान परिषदेसाठी भाजपचा उमेदवार कोण?:परिचारक, पवारांच्या समर्थकांचे सोशल मीडियावर 'भावी आमदार'चे स्टेटस

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-31t092911883_1780200018.jpg




बाजार समिती, जिल्हा परिषद व‎पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी ‎भाजपला तालुक्यात शत-प्रतिशत यश‎ मिळवून देत विधानसभेचा पराभव हा‎ एक राजकीय अपघात होता हे ‎दाखवून देत पक्षातील आपले स्थान‎ बळकट केले आहे. पक्षश्रेष्ठींच्या‎ सूचनेविना ते उमेदवारी अर्ज आणणार‎ नाहीत, असा राजकीय निरीक्षकांचा‎ कयास आहे. उमेदवारीबाबत राजेंद्र राऊत‎ यांनी अधिकृत कसलेच मत जाहीर‎ केलेले नाही. भाजपच्या रणनितीचा ‎भाग म्हणूनही राऊत यांच्या‎ निकटवर्तीयांना अर्ज घेण्याची सूचना‎ असावी असे मानले जाते.‎ विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज ‎‎दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा ‎‎दिवस आहे. दरम्यान शनिवारी बार्शीचे ‎‎माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या‎नावे निकटवर्तीयांनी उमेदवारी अर्ज ‎‎घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‎‎दुसरीकडे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार व ‎‎माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या ‎‎समर्थकांनी समाज माध्यमांवर ‎आपल्याच नेत्यांचे फोटो ’भावी‎आमदार’ म्हणून ठेवत व्हायरल‎ केल्याने उमेदवारी नेमकी कोणाला ‎‎मिळणार याबाबत उत्सुकता राहिली ‎‎आहे. एक हुकुमी बहुमत असताना ‎‎उमेदवार जाहीर न केल्याने भाजपच्या ‎‎रणनितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेसाठी प्रशांत‎ परिचारक (पंढरपूर), राजेंद्र राऊत‎ (बार्शी), रश्मी बागल, जिल्हाध्यक्ष‎शहाजी पवार (सोलापूर) यांच्यासह‎इतर काही नेत्यांची नावे आहेत.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎राऊत यांनी सहकाऱ्याकरवी‎भाजपच्या नावावर ४ उमेदवारी‎अर्जांची खरेदी केली. त्यामुळे‎राऊतांनाच उमेदवारी मिळेल, अशी ‎चर्चा सुरु झाली.‎‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed