दगडूशेठ ट्रस्टच्या 'श्रीमंत' कॉफी टेबल बुकचे प्रकाशन:सामाजिक कार्याचा आढावा; मोहन जोशींच्या हस्ते प्रकाशन

0
8a786205-41ce-4c16-ac22-f62a97af799b_1780136451473.jpg




श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या ‘श्रीमंत’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन नुकतेच मंदिरात झाले. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. या कॉफी टेबल बुकमध्ये ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. या ग्रंथपुष्पाचे प्रायोजकत्व वामन हरी पेठे ज्वेलर्सने केले आहे. यावेळी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे भागीदार आशिष पेठे, गौरी पेठे, आदिवेद अॅडव्हर्टायजिंगचे सर्जनशील संचालक व लेखक मिलिंद घैसास, कला संचालक स्वाती घैसास उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, प्रतीक घोडके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, हा दिवस त्यांच्या आयुष्यात कायम स्मरणात राहील. मंदिरात आल्यावर त्यांना खूप प्रसन्न वाटले. त्यांनी ट्रस्टच्या सर्व क्षेत्रांतील कार्याचे कौतुक केले आणि ‘श्रीमंती’ ही सेवा, साधना व सद्भावनेतून साकारलेली शाश्वत बाब असल्याचे म्हटले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, या कॉफी टेबल बुकमध्ये मंदिराची आजपर्यंतची वाटचाल आणि ट्रस्टच्या माध्यमातून घडलेले धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य समाविष्ट आहे. मंदिराचा गणपती मंडळ ते तीर्थक्षेत्र असा प्रवास यातून उलगडण्यात आला आहे. ट्रस्टने पारदर्शकतेने समाजातील प्रत्येक घटकाचा विश्वास संपादन केला असून, याच विश्वासाच्या भक्कम पायावर समाजकार्याची ही ‘श्रीमंती’ उभी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed