कॉर्पोरेट जिहादप्रकरणी 8 गुन्ह्यांसाठी 8 स्वतंत्र आराेपपत्र:एकात निदाचे नाव, टीसीएस अत्याचारप्रकरणी एसआयटीचा ॲक्शन प्लॅन

0
orig_db-temp-cover-marathi-2026-04-17t22411453717764458_1780016362.jpg




टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंग आणि लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल ८ गुन्ह्यांचे ८ आरोपपत्र गुरुवारी कोर्टात दाखल करण्यात आले. एसआयटीचा हा अत्यंत मोठा अ‍ॅक्शन प्लॅन मानला जातो. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनांनुसार तपासाकरिता एसआयटी स्थापन केली. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे १,५०० पानांचे आरोपपत्र दाखल झाले. या प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी निदा खान हिला आश्रय देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची सोमवारी १० तास चौकशी करण्यात आली होती. दाखल गुन्हे व त्यातील आरोपीची माहिती अशी संशयित कारागृहात… गुन्ह्यातील सर्व संशयितांच्या विरोधात पीडितांसह साक्षीदारांनी दिलेली साक्ष, पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने सर्व संशयितांचे जामीन फेटाळून लावले आहेत. सर्व संशयित मध्यवर्ती कारागृहात आहेत. सर्व संशयित कायद्याच्या कचाट्यात पूर्णपणे अडकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed