Rishabh Pant | ऋषभ पंतने सोडली LSG कॅप्टनसी, कारण आलं समोर

0
Rishabh-Pant.webp.webp


Rishabh Pant | आयपीएल (IPL) 2026 मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाची निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने मोठा निर्णय घेतला आहे. संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर पंतने कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केली असून क्रिकेट विश्वात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तब्बल 27 कोटी रुपयांत संघात घेतलेल्या पंतकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र संघ आणि वैयक्तिक कामगिरी दोन्ही ठिकाणी तो अपेक्षांवर उतरू शकला नाही.

लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघासाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. 14 सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकण्यात संघाला यश मिळाले, तर तब्बल 10 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. यामुळे गुणतालिकेत संघ दहाव्या स्थानावर घसरला आणि प्ले-ऑफमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. सततच्या पराभवामुळे ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्यावर मोठा मानसिक दबाव निर्माण झाला होता, अशी चर्चा सुरू आहे.

लखनौचे क्रिकेट संचालक टॉम मूडी (Tom Moody) यांनीही यापूर्वी कॅप्टनसीच्या दबावाचा परिणाम पंतच्या फलंदाजीवर होत असल्याचे संकेत दिले होते. 2025 च्या हंगामात पंतला फक्त 269 धावा करता आल्या होत्या, तर 2026 मध्येही त्याची कामगिरी फारशी सुधारली नाही आणि त्याने 312 धावाच केल्या. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा पंत मागील दोन हंगामात आपल्या नावाला साजेशी खेळी करू शकला नाही.

Rishabh Pant | 27 कोटींचा निर्णय ठरला अपयशी? :

आयपीएल (IPL) लिलावात लखनौ सुपर जायंट्सने (LSG) ऋषभ पंतला तब्बल 27 कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले होते. केएल राहुल (KL Rahul) नंतर संघाची धुरा त्याच्याकडे सोपवण्यात आली होती. संघासाठी 200 टक्के योगदान देण्याचे आश्वासनही त्याने दिले होते. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळाले नाही. पंतच्या नेतृत्वात संघाने केवळ 10 सामने जिंकले, तर 18 सामन्यांत पराभव पत्करावा लागला.

आता पुढे लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) संघात केवळ फलंदाज म्हणून कायम राहणार की त्याच्याबाबत आणखी मोठा निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निकोलस पूरन (Nicholas Pooran), मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि एडन मार्करम (Aiden Markram) यांसारख्या खेळाडूंना पुढील कर्णधारपदासाठी पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

News title : Rishabh Pant Resigns As LSG Captain

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *