MS Dhoni | थाला फॅन्ससाठी गूड न्यूज! IPL 2027 मध्ये MS Dhoni नव्या भूमिकेत दिसणार?
MS Dhoni | एम एस धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील नातं आता नव्या टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयपीएल 2026 (IPL 2026) हंगामात दुखापतीमुळे धोनी एकही सामना खेळू शकला नाही. त्यानंतर त्याच्या निवृत्तीबाबत चर्चांना वेग आला होता. आता सीएसके व्यवस्थापनाकडून आलेल्या संकेतांमुळे धोनी भविष्यात संघासोबत नव्या भूमिकेत दिसू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे.
संपूर्ण आयपीएल हंगामात धोनी मैदानावर उतरला नसल्यामुळे अनेकांनी त्याच्या कारकिर्दीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. काही क्रिकेट चाहत्यांनी तर धोनीने शांतपणे आयपीएलमधून निवृत्ती घेतल्याचाही अंदाज व्यक्त केला होता. मात्र चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन (Kasi Viswanathan) यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
कासी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले की, सीएसकेला धोनी कायम संघासोबत हवा आहे. तो खेळाडू, प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक अशा कोणत्याही भूमिकेत असो, पण संघाचा भाग राहावा अशी फ्रँचायझीची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अंतिम निर्णय पूर्णपणे धोनीचाच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आयपीएल 2027 (IPL 2027) मध्ये धोनी कोच किंवा मेंटॉरच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
MS Dhoni | मैदानाबाहेरूनही कायम चर्चेत :
आयपीएल 2026 मध्ये दुखापतीमुळे धोनी संपूर्ण हंगामात खेळताना दिसला नाही. तरीदेखील चेन्नईच्या अखेरच्या घरच्या सामन्यावेळी तो संघासोबत स्टेडियममध्ये उपस्थित होता. त्यामुळे संघाशी त्याचे नाते कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
धोनीने कोणती भूमिका स्वीकारायची याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सीएसके व्यवस्थापनाच्या वक्तव्यामुळे निवृत्तीच्या चर्चांना मोठी चालना मिळाली आहे. क्रिकेट विश्वात ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाणारा धोनी भविष्यात मैदानावर खेळाडू म्हणून दिसेल की प्रशिक्षकाच्या भूमिकेत, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
