'व्हर्च्युअल बकरी'वरून भाजपमध्येच जुंपली:हाजी अराफत शेख यांचा नितेश राणेंना टोला, म्हणाले- रविवारी मटणाच्या ऐवजी कागद खाऊन बघा
![]()
बकरी ईदच्या दिवशी व्हर्च्युअल बकरी कापा, असा सल्ला भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. यावर विरोधकांकडून टीका केली जात आहेच. त्यात आता त्यांच्याच पक्षातल्या नेत्याने घरचा आहेर दिला आहे. हाजी अराफत शेख यांनी नितेश राणे यांच्यावर खोचक टीका केली आहे. भाजप नेते हाजी अराफत शेख म्हणतात, नितीश राणे यांनी थोडे समजून घेण्याची गरज आहे. हा ईदचा सण आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांचे स्वतःचेही एक मटणाचे दुकान आहे. त्यांचे वडील एका मटणाच्या दुकानापासून सुरुवात करून मंत्रीपदापर्यंत आणि केंद्र सरकारमधील एका उच्चपदस्थ व्यक्तीपर्यंत पोहोचले. चेंबूरमध्ये त्यांचे स्वतःचे एक हॉटेल आहे, ज्याला त्यांनी आपल्या आईचे नाव दिले आहे. तिथे ते उत्तम दर्जाचे खेकडे, मासे आणि मटण मसाला विकतात. त्यामुळे, नितीश राणे, तुम्ही हे समजून घेणे गरजेचे आहे. तुमच्या मटणाच्या दुकानाकडे आणि तुमच्या हॉटेलकडे एकदा पाहा. आणि जर तुम्ही रविवारी मटण खात असाल, तर मटणाऐवजी एकदा कागद खाऊन नक्की पाहा. म्हणजे तुम्हाला त्याची चव कशी असते, हे समजेल, असा टोलाही हाजी अराफत शेख यांनी लगावला आहे. हिंदू कसाई बांधावांनाही त्रास होत आहे हाजी अराफत शेख पुढे म्हणाले की, जेव्हा मी तुमच्या हॉटेलमध्ये जातो, तेव्हा तिथले जेवण अतिशय चविष्ट असते आणि मटणही उत्तम असते. मी नितीश राणे यांना हे सांगू इच्छितो की, शेळ्यांची वाहतूक करणारी वाहने अडवली जात आहेत आणि यामुळे हिंदू कसाई बांधवांना खूप त्रास होत आहे. धनगर समाजही यामुळे खूप व्यथित झाला आहे आणि मुस्लिम समाजही खूप अस्वस्थ आहे. ईदच्या दिवशी मटण खायला या कसाई समाजाला वर्षातून एकदाच कमाई करण्याची संधी मिळत असते. चेंबूरमधील तुमच्या दुकानात तुमचा व्यवसाय चांगला चालतो, त्यामुळे आमच्या व्यवसायाचाही थोडा विचार करा. मी त्यांना असा सल्ला देईन की, त्यांनी जाऊन त्यांचे वडील नारायण राणे यांच्याकडून थोडा बोध घ्यावा. मी त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो. मी त्यांना ईदच्या दिवशी माझ्या घरी येऊन मटणाचा आस्वाद घेण्याचे निमंत्रण देतो, असे म्हणत हाजी अराफत शेख यांनी नितेश राणे यांनी आमंत्रणही दिले आहे.
