Post Office Investment | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 9 योजनांत पैसे गुंतवा होतील दुप्पट? पाहा सविस्तर माहिती
Post Office Investment | सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केला की अनेकजण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांकडे वळतात. कमी जोखीम आणि निश्चित परतावा यामुळे या योजना सामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. नोकरी, व्यवसाय किंवा शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग योग्य ठिकाणी गुंतवणे महत्त्वाचे मानले जाते. पोस्ट ऑफिस विविध गरजांनुसार अनेक बचत योजना चालवत असून त्यामध्ये गुंतवलेली रक्कम किती कालावधीत दुप्पट होते, याची माहिती आता समोर आली आहे.
गुंतवणुकीची रक्कम किती वर्षांत दुप्पट होईल हे समजण्यासाठी ‘फॉर्म्युला 72’ वापरला जातो. यामध्ये 72 या आकड्याला संबंधित योजनेच्या व्याजदराने भाग दिला जातो. त्यानंतर मिळणारे उत्तर म्हणजे अंदाजे किती वर्षांत पैसे दुप्पट होतील, हे समजते.
पोस्ट ऑफिसच्या (Post Office) टाईम डिपॉझिट योजनेत 1 ते 3 वर्षांसाठी 5.5 टक्के व्याज मिळत आहे. या दरानुसार गुंतवणूक केलेली रक्कम सुमारे 13 वर्षांत दुप्पट होऊ शकते. तर 5 वर्षांच्या टाईम डिपॉझिटवर 6.7 टक्के व्याज मिळत असून त्यात सुमारे 10 वर्षे 9 महिन्यांत पैसे दुप्पट होतात. रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडी योजनेवर 5.8 टक्के व्याज मिळत असून या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास अंदाजे 12 वर्षे 5 महिन्यांत रक्कम दुप्पट होऊ शकते.
पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये 4.4 टक्के व्याज दिले जात असून त्यात पैसे दुप्पट होण्यासाठी जवळपास 18 वर्षांचा कालावधी लागू शकतो. मासिक उत्पन्न योजना म्हणजेच Monthly Income Scheme मध्ये 6.6 टक्के व्याजदर मिळतो. या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम अंदाजे 11 वर्षांत दुप्पट होऊ शकते.
Post Office Investment | पीपीएफ ते सुकन्या योजनांपर्यंत चांगला परतावा :
सिनियर सिटीझन स्कीममध्ये सध्या 7.4 टक्के व्याज मिळत असून ज्येष्ठ नागरिकांची गुंतवणूक सुमारे 9 वर्षे 7 महिन्यांत दुप्पट होऊ शकते. Public Provident Fund अर्थात PPF योजनेवर 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. त्यामुळे या योजनेत अंदाजे 10 वर्षांच्या कालावधीत रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) मध्ये मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणूक करणाऱ्यांना 7.6 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे सुमारे 9 वर्षे 6 महिन्यांत दुप्पट होऊ शकतात. National Saving Certificate योजनेवर 6.8 टक्के व्याज मिळत असून त्यात अंदाजे 10 वर्षे 7 महिन्यांत रक्कम दुप्पट होईल.
किसान विकास योजनेत (Kisan Vikas Patra) 6.9 टक्के व्याजदर मिळत असून येथे गुंतवलेले पैसे जवळपास 10 वर्षे 4 महिन्यांत दुप्पट होतात. या योजनेत किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते आणि कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. सुरक्षित गुंतवणूक आणि हमी परताव्यामुळे पोस्ट ऑफिसच्या या योजना आजही गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत आहेत.
