दिव्य मराठी ब्रेकिग:दहावीच्या परीक्षेच्या 2 तास आधी ऑनलाइन प्रश्नपत्रिका मिळणार, पुरवणी परीक्षेत पथदर्शी प्रकल्प
![]()
नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता दहावीच्या प्रश्नपत्रिका थेट परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने पाठवल्या जातील. पेपर सुरू होण्यापूर्वी केवळ दोन तास आधी या प्रश्नपत्रिका अत्यंत सुरक्षित प्रणालीद्वारे केंद्रांना मिळतील व तिथेच त्यांची छपाई करून त्या विद्यार्थ्यांना वितरित केल्या जातील. आगामी जून महिन्यात होणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेपासून पथदर्शी प्रकल्प म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरुवातीला पुण्यातील 24 परीक्षा केंद्रांवर एका विषयाच्या पेपरसाठी हा प्रयोग राबवला जाईल. यापूर्वी दहावी-बारावीचे पेपर वाहतुकीदरम्यान किंवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यावर कायमस्वरूपी उपाय व नवा अँगल म्हणून या सुरक्षित डिजिटल प्रणालीकडे पाहिले जात आहे. पुण्यात घेण्यात येणारा हा प्रयोग जर 100 टक्के यशस्वी ठरला, तर आगामी मुख्य परीक्षांसाठी राज्यातील सर्व 9 विभागीय मंडळांमध्ये (पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षांसाठी हीच ऑनलाइन पद्धत लागू होईल. अशी असेल नवीन डिजिटल प्रणाली गडचिरोलीसाठीही प्रयत्न सुरू जून महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी पायलट प्रोजेक्ट राबवणार आहोत. गडचिरोली येथे देखील राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याबाबत अजून निर्णय नाही. यामुळे खर्चात देखील बचत होईल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असेल. – त्रिगुण कुलकर्णी, अध्यक्ष, राज्य मंडळ, पुणे
