भाेंदूगिरीचा कॅप्टन:भाेंदू अशोक खरातच्या साथीदाराकडून ईडीने एकाच दिवसात जप्त केले 13.50 काेटी, गुंतवणूकदार चाैकशीच्या फेऱ्यात

0
orig_new-project-2026-05-14t111320285_1779500036.jpg




भोंदू अशोककुमार खरात याच्याविरोधात महिलांना गुंगीचे औषध पाजून बलात्कार केल्याचे तब्बल १२ आणि आर्थिक फसवणुकीचे ५ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांत तो गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत आहे. आता खरातला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली असून, त्याच्या सहकाऱ्यांचीही ईडीने चौकशी सुरू केली. त्यात खरातची काळी कमाई गुंतवणाऱ्या एका व्यावसायिकाने एकाच दिवसात तब्बल १३.५० कोटी रुपये थेट ईडीच्या बँक खात्यात जमा केले आहेत. ही सर्व रक्कम अशोक खरातचीच गुंतवणूक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पीएमएलए न्यायालयाने आरोपीला २६ मे २०२६ पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. अवतार पूजा आणि ५.६२ कोटींची खंडणी खरातने धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली उकळली असून त्याने खंडणीचे मोठे रॅकेटही चालवले. खरातने पूजा आणि इतर उपायांच्या बहाण्याने तब्बल ५.६२ कोटी रुपयांची खंडणी उकळली. याच पैशांतून त्याने एक आलिशान मर्सिडीझ कार खरेदी केली, परदेश वाऱ्या केल्या आणि अमेरिकेत स्वतःवर वैद्यकीय उपचारही करून घेतले. जगदंबा, समता पतसंस्थांमध्ये २०० कोटींचे व्यवहार ईडीच्या मुंबई पथकाच्या तपासात उघडकीस आलेल्या प्रकरणात, काळा पैसा पांढरा करण्यासाठी संशयित खरातने दोन पतसंस्थांचा पद्धतशीरपणे वापर केला. खरात व त्याच्या साथीदाराने सिन्नर तालुक्यातील जगदंबा पतसंस्था व अहिल्यानगर येथील समता पतसंस्थेत तब्बल १०० हून अधिक बेनामी खाती उघडून, त्यात सुमारे २०० कोटी रुपयांच्या रक्कमेचे व्यवहार केल्याचे तपासात आढळून आले आहे. ईडीकडून जप्त मुद्देमाल १३.९२ कोटी रुपये रोख. सुमारे ५.११ लाख रुपये) विदेशी चलन १.१२ कोटींचे रुपयांचे सोने-चांदीचे दागिने २.२५ कोटी रुपये बँक खात्यातील गोठवले एमएच १५ जीएल ८१८१ या क्रमांकाची मर्सिडीज कार आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, मालमत्तेच्या नोंदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed