Election Commission | …तर मतदानाचे नाव यादीतून कट होणार! निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ‘या’ ४ गोष्टी नक्की करा

0
List-of-all-Chief-Election-Commissioners-and-Election-Commissioners-of-India.webp.webp


Election Commission | मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एसआयआर (SIR) मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे मतदारांची माहिती पडताळणी आणि नाव नोंदणीची प्रक्रिया राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या असून बीएलओ (BLO) अधिकारी घरी आल्यानंतर काय करावे याबाबत माहिती स्पष्ट केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, मतदार यादीत आपले नाव शोधणे आता अधिक सोपे झाले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर देशातील सर्व राज्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडून मतदार आपले नाव तपासू शकतात. एखाद्याला मतदान केंद्राची अचूक माहिती नसेल, तरी मतदारसंघाचे नाव माहिती असल्यास नाव शोधणे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एसआयआर (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार गणना फॉर्म भरणे आणि सादर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या मतदारसंघाची माहिती आधीच शोधून ठेवली तर बीएलओ (BLO) अधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद पूर्ण करण्यास मदत होईल. राज्य, जिल्हा, मतदारसंघ, बुथ आणि सीरिअल नंबर ही माहिती वेबसाइटवरून आधीच काढून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Election Commission | कागदपत्रांबाबत आयोगाची सूचना :

एसआयआर (SIR) मोहिमेदरम्यान 30 जूनपर्यंत बीएलओ (BLO) अधिकारी घरोघरी भेट देणार आहेत. जर नागरिकांकडे आवश्यक माहिती उपलब्ध नसेल, तर निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या 11 प्रकारच्या कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र दाखवावे लागणार आहे. नागरिकत्वाचा पुरावा आणि 1987 पूर्वीचा जन्म असल्याचे दाखवणारे दस्तऐवज आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

जर आधीपासूनच मतदार नोंदणीचे मॅपिंग झालेले असेल, तर अतिरिक्त कागदपत्रांची गरज भासणार नाही. मात्र, माहितीमध्ये विसंगती असल्यास संबंधित पुरावे द्यावे लागतील. उदाहरणार्थ, लग्नानंतर आडनाव बदलले असल्यास लग्नपत्रिका वैध पुरावा म्हणून स्वीकारली जाईल. 2011 मधील मतदार यादीतील नाव आणि सध्याच्या कागदपत्रांमधील नाव जुळत नसल्यास आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.

निवडणूक आयोगाने (Election Commission of India) असेही सांगितले की, एखादी व्यक्ती महिनाभर गावाबाहेर असेल तर कुटुंबातील इतर सदस्य त्याच्या वतीने सही करू शकतात. जर नाव ड्राफ्ट यादीत नसले, तरी संबंधित व्यक्तीचा मतदानाचा हक्क संपणार नाही. त्यासाठी फॉर्म क्रमांक 6 भरून घोषणा सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनाही बीएलओ (BLO) अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

News title : Voter List Verification Process Explained

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed