अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक:संदीप कोतकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, संख्याबळात भाजप नंबर वन, तरीही जागा राखण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रबळ दावा
![]()
अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी महायुतीमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू झाली आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये दिवंगत अरुण जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर वर्चस्व राखले होते, त्यामुळे राष्ट्रवादी या जागेवर आपला मूळ दावा सांगत आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या एकूण 461 मतदारांपैकी सर्वाधिक 199 नगरसेवक भाजपचे आहेत. या संख्याबळाच्या जोरावर भाजपने आणि राजकीय समतोलाचा दाखला देत शिंदे यांच्या शिवसेनेनेही या जागेवर दावा ठोकला आहे. माजी महापौर संदीप कोतकर, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आणि क्षितीज घुले यांसारख्या बड्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आल्याने चुरस कमालीची वाढली आहे. संदीप कोतकर हे भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नेमके आता कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादीचे 4 आमदार मात्र, दरम्यानच्या काळात जिल्ह्यात झालेल्या महापालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत.त्यामुळे भाजपकडून या जागेसाठीआग्रह सुरू झाला आहे. राष्ट्रवादी वभाजपात या जागेवरून रस्सीखेच सुरूअसतानाच आता शिंदेच्या शिवसेनेनेही या जागेवर संधी मिळावी, अशी मागणीपुढे केली आहे.जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 4 आमदार आहेत.तसेच, विधान परिषदेतही जिल्ह्यातून भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी मिळालेली आहे. त्यामुळे शिवसेनेला संधी देऊन राजकीय समतोल राखला जावा, असा दावा केला जात आहे. राष्ट्रवादीला जागा मिळाली तरीही भाजपवरच मदार विधान परिषदेच्या राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी अपवाद वगळता महायुतीत सर्वच जागांवर रस्सीखेच सुरू आहे. तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्रितपणे जागा वाटपाचा निर्णय घेणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दोन निवडणुकांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली जागा याही वेळेस भाजपने औदार्य दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली, तरीही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मदार भाजपवरच असणार आहे. जिल्ह्यात भाजपचे नगरसेवक सर्वाधिक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निश्चितीमध्येही भाजपची व पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची असणार आहे. मतदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक
199, राष्ट्रवादीचे 50 नगरसेवक जिल्ह्यात महापालिका, नगरपालिका व नगर पंचायतींमध्ये महायुतीचेवर्चस्व आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या एकूण 461 मतदारांमध्येसर्वाधिक 199 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 50, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 35, शिवसेना शिंदे गटाचे 48, काँग्रेसचे 29, तर इतर पक्ष व अपक्ष असे 100 नगरसेवक आहेत.
