Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

0
Ladki-Bahin-Yojana-2.webp.webp


Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) संदर्भात राज्य सरकारकडून मोठी अपडेट समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता न मिळालेल्या महिलांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, थेट 3000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

महिला व बाल विकास विभागासाठी राज्य सरकारने मोठ्या निधीला मंजुरी दिली आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनुसार मार्च 2026 महिन्यासाठी 365.2550 कोटी रुपये आणि एप्रिल 2026 साठी आणखी 365.2550 कोटी रुपये असा एकूण 730.5100 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

14 मेपासून काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. अनेक लाभार्थींना मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे मिळाले. मात्र काही महिलांना अद्याप कोणताही लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांचे नाव योजनेतून वगळले गेले का, अशी भीती निर्माण झाली होती. आता नव्या शासन निर्णयामुळे उर्वरित महिलांच्या खात्यातही पैसे जमा होण्याची शक्यता वाढली आहे. सरकारने वितरीत केलेला निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीमार्फत खर्च केला जाणार असून, काटकसरीच्या नियमांचे पालन करून निधी वापरण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana | 70 लाख महिलांवर अपात्रतेची कारवाई :

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी (e-KYC) आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर मोठ्या प्रमाणावर महिलांची नावे कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने जवळपास 70 लाख महिलांना अपात्र घोषित केले असून, त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

महिला व बाल विकास राज्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वेळा मुदतवाढ देऊनही मोठ्या संख्येने महिलांनी अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे पडताळणीनंतर अशा लाभार्थींना योजनेतून वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे दरमहा 1500 रुपयांची मदत मिळवणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मात्र ज्या पात्र महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात आता कोणत्याही क्षणी पैसे जमा होऊ शकतात.

News title : Ladki Bahin Installment Update

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *