14 वर्षांच्या मुलीशी लग्न करायचेय, अडचण येणार का?:तरुणाची वकिलालाच विचारणा, लगेच यंत्रणा कामाला, तरुण निघाला मानसिक रुग्ण
![]()
न्यायालयात नेहमीची लगबग सुरू होती. एक वकील आपली केस संपवून नुकतेच कोर्टरूमच्या बाहेर आले. त्यांच्यासमोर पंचविशीतील एक तरुण उभा होता. तो जवळ आला आणि संकोचत म्हणाला, “सर, मला थोडी कायदेशीर मदत हवी होती. मला एका १४ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचे आहे… क
.
वेळेशी झुंज आणि थरारक सुटका
मुलीला घरी आणण्यापूर्वी काही कायदेशीर अडचण तर येणार नाही ना, याची खात्री करण्यासाठी तो न्यायालयात पोहोचला. एका वकिलाची गाठ पडली. वकिलाने प्रसंग ओळखला. मुलीचा जीव वाचवणे ही पहिली प्राथमिकता होती. त्यांनी तरुणाला विश्वासात घेतले. “तू त्या मुलीला घेऊन ये, आपण ती स्वमर्जीने लग्न करत असल्याचे कायदेशीर शपथपत्र तयार करू,” असे सांगून त्याला तेथेच गुंतवून ठेवले. यानंतर सूत्रे अत्यंत वेगाने हलली. त्या वकिलाने थेट खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील यांच्याशी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. मुख्य सरकारी वकिलांनी ही बाब न्यायधीशांना सांगितली, त्यांनी पोलिस आयुक्तांना फोन लावला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे अधिकारी तातडीने सक्रिय झाले. तो तरुण शहरातील एका संस्थेतून शिक्षण घेत असल्याची माहिती वकिलाने संवादातून काढली होती. त्याआधारे संस्थेकडून त्याचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक मिळवण्यात आला. गुन्हे शाखेचे पीआय गजानन कल्याणकर यांच्या पथकाने पथकाने मोबाइल लोकेशन ट्रेस केले आणि अवघ्या ६ तासांत त्या तरुणाचे घर गाठले. त्याच्या पालकांशी संवाद साधला. तो मानसिक रोगी असल्याचे समोर येताच यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. विशेष म्हणजे या प्रकरणात कोणतीही मुलगी नसल्याचे उघड झाले.”
‘माझे लग्न होईल का?’ चॅटजीपीटीला विचारायचा प्रश्न
तो “माझे लग्न होईल का? कधी होईल?” असे प्रश्न तो रात्री-अपरात्री चॅटजीपीटीवर विचारत बसायचा. त्याच्या याच मानसिक आजाराचा आणि हतबलतेचा फायदा काही मित्रांनी घेतला. एका मित्रांनी त्याला गाठले आणि अत्यंत चलाखीने त्याला खोटे सांगितले. “एक मुलगी आहे जिचे कुणीही नाही. तिचे नातेवाईकच तिला द्यायला तयार आहेत. तू पैसे दिले की ती तुझी,” अशी खोटी थाप मारली. सद्सद्विवेकबुद्धी हरवलेल्या आणि मानसोपचारांवर असलेल्या त्या तरुणाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. एकदा लग्न करून मूल झाले की ती मुलगी आपल्याला कधीच सोडून जाणार नाही, अशी पक्की आणि चुकीची समजूत त्याच्या आजारी मनावर बिंबवण्यात आली होती.
