लोहा शहरातील तीन लॉजवर पोलिसांची धडक कारवाई; १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

0
WhatsApp-Image-2026-05-17-at-16.53.24.jpeg


नांदेड (प्रतिनिधी)- लोहा शहरातील अवैध व्यवसायांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन लॉजवर छापे टाकले. या कारवाईत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये तब्बल १० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे लोहा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे १६ मे रोजी सायंकाळी लोहा शहरातील निलय लॉज येथे छापा टाकण्यात आला. या वेळी लॉजमध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी लॉजमधील तीन महिलांची सुटका केली असून घटनास्थळी काही जण मद्यपान करत असल्याचेही आढळून आले. या प्रकरणी रामकिशन विठ्ठलराव ढगे (वय ४७, व्यवसाय-लॉजिंग), गुलाब रशीद शेख, सोमनाथ गंगाधर जंगले, बाळाजी दत्ता जाधव, आनंद प्रकाश श्रीमंगले, शिलानंद कमलाकर वारकरे यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियमासह विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, लोहा शहरातील रणवीर लॉज व आर्या लॉज यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांची नोंद न ठेवणे, ओळखपत्र न घेता खोल्या भाड्याने देणे अशा नियमभंगाच्या प्रकारांचा उलगडा झाला. याप्रकरणी रणवीर लॉजचे मालक बाळाजी सदाशिव जाधव व मॅनेजर रफिक अमीर शेख तसेच आर्या लॉजचे मालक अजय मारोती भिसे व मॅनेजर माधव गणेश कंधारे यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी देशी व विदेशी दारूसह सुमारे ३ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव तसेच लोहा व कंधार पोलिसांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे


Post Views: 421






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed