कृष्णांची छापेमारी, 3 टेम्पो गुटखा जप्त‎:पदभार घेताच बार्शीत गोदामावर छापा; अन्न व औषधाचे पथक न आल्याने गुन्हा नोंद नाही‎

0
new-project-2026-05-17t082213253_1778986397.jpg




बार्शी उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार हाती घेतल्यानंतर आयपीएस अंजना कृष्णा यांनी शनिवारी (दि. १६) बार्शी शहर पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या बालाजी कॉलनीमधील एका बड्या विक्रेत्याच्या अवैध गुटखा साठा केलेल्या गोदामावर छापा टाकला. या कारवाईत लाखो रुपयांचा तब्बल तीन टेम्पोहून अधिक अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आला. सदरची कारवाई आयपीएस कृष्णा यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने केली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने रात्री उशिरापर्यंत पोलिसांत खाजगी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू असल्याने या कारवाईची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. याबाबत अन्न व औषध प्रशासन सोलापूर विभागाचे अधिकारी रामानंद स्वामी यांच्याशी संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही. हा व्हिडीओ पाहण्यासाठी क्यूआर स्कॅन करा पोलिस प्रशासनाला अवैध गुटख्याची विक्री होत असताना कायदेशीर कारवाई करता येत नसल्याचा गैरफायदा घेत सर्व परिसरात अवैध गुटखा विक्रेत्यांचे फावले आहे. स्थानिक पोलिस अवैध गुटखा जप्त करू शकतात. मात्र कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याने अन्न औषध प्रशासनाकडे तो जप्त केलेला साठा देऊन अन्न औषध प्रशासनाची फिर्याद दाखल करून कारवाई करावी लागते. याचा फायदा घेऊन करोडो रुपयांचा अवैध गुटखा साठा करून तो बार्शीसह जिल्ह्यात विक्री करण्यात येत आहे. यापूर्वी शहर व तालुक्यात अवैध गुटखा विक्री करताना अन्न औषध प्रशासनाने किरकोळ स्वरूपाच्या कारवाया केल्या. मात्र आयपीएस कृष्णा यांनी प्रथमच शहरात एका बड्या व्यापाऱ्याच्या अवैध गुटखा साठ्यावर छापेमारी करत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. आता अन्न व औषध प्रशासन अधिकारी याबाबत काय कायदेशीर कारवाई करतात याकडे लक्ष लागले. पान टपऱ्या, हॉटेल्स, किराणा दुकान येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गुटखा, सुगंधी तंबाखू विक्री केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed