लोकरंगद्वारा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा श्रीगणेशा:अभिनेता बनण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज, भारत गणेशपुरे; उद्घाटनाला मान्यवर उपस्थित‎

0
240_17789232046a0836c46f498_15balnata.jpg




लोकरंग द्वारा आयोजित तीन दिवशीय अभिनय तथा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ झाला.‎ १७ मेपर्यंत चालणाऱ्या या नाट्य‎तथा अभिनय प्रशिक्षण शिबिराचे‎आयोजन करण्यात आले असून‎.भारत गणेशपुरे आणि अंकुरजी‎वाढवे हे दोन प्रसिद्ध अभिनेते‎नाट्य प्रशिक्षणाचे धडे या‎शिबिरामध्ये सर्वांना देत आहेत. ‎जिल्हाभरातील प्रशिक्षणार्थ्यांनी या‎नाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभाग‎नोंदविला असून उद्घाटन‎समारंभा नंतर लगेच या शिबिराचा‎प्रारंभ झाला. सुरुवातीला सर्वांचा‎परिचय करून घेत दोन्ही‎अभिनेत्यांनी प्रशिक्षण देण्यास‎सुरुवात केली आहे.‎ नवीन शिकण्याची‎वृत्तीच मोठं बनवते‎ तीन दिवसांच्या या शिबिरांमध्ये‎सहभागी झालेल्या सर्वांनी आपल्या‎मनात असलेले प्रश्न बिनधास्त‎विचारा आणि आनंदाने हे शिबिर‎पार पाडा असे आवाहनही या प्रसंगी‎बोलताना गणेशपुरे यांनी केले.‎सुप्रसिद्ध अभिनेते अंकुर वाढवे‎यांनीही याप्रसंगी आपले मनोगत‎व्यक्त केले. सतत काहीतरी नवीन‎शिकण्याची वृत्तीच आपल्याला‎मोठं बनवायला मदत करते असे‎प्रतिपादन याप्रसंगी वाढवे यांनी‎केले. नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या‎उद्घाटन समारंभात बोलताना‎आपल्या जीवनातील संघर्ष त्यांनी‎प्रशिक्षणार्थ्यांसमोर मांडला.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed