शेतीच्या शाश्वततेसाठी हवे एकात्मिक प्रयत्न:आ. सावरकर यांचे प्रतिपादन, कृषी विद्यापीठाचा पाणी फाउंडेशनसोबत सामंजस्य करार‎

0
transfar_240_17789154826a08189a2e1c0_sawarkar.jpg



शेती व ग्रामीण भागाचा विचार करता देशांतर्गत कृषी विद्यापीठे व तत्सम संशोधन संस्थांच्या निरंतर प्रयत्नातून काळसुसंगत फायदेशीर शेती तंत्रज्ञान मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही त्याचा अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे गावखेड्याकडील शेतकरी विशेषतः युवावर्ग शे

.

आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी शेती ही शाश्वत होणे आवश्यक आहे. ग्रामविकासाशी संबंधित शासकीय, निमशासकीय विभाग, पाणी फाउंडेशन आदी सेवाभावी संस्थांसह सर्वांनीच एकात्मिक प्रयत्नांची मोठ बांधत आपले सर्वोत्तम योगदान द्यावे. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाकरिता आ. रणधीर सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक संशोधन डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, पाणी फाउंडेशनचे उज्वल बोलवार, नामदेव ननावरे यांच्यासह विभागप्रमुख डॉ. नितीन कोष्टी, डॉ. निशांत शेंडे, डॉ. मोहन तोटावार, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. उमेश चिंचमलातपुरे व प्रा. संजीवकुमार सलामे, डॉ. राजीव इसाळ आदी उपस्थित होते.

कालसुसंगत पीक पद्धतीचा अवलंब करा निसर्गाने काळी कसदार शेतीयोग्य जमीन व आवश्यक पाऊसमान दिलेल्या विदर्भात शेतीला सुगीचे दिवस आणण्यासाठी पारंपारिक शेती पद्धतीला फाटा देत अकोला कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनात अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासह कालसुसंगत पीक पद्धतीचा अवलंब करावा. त्याला पशुपालन दुग्ध व्यवसायासह फळपिकांची सक्षम साथ दिल्यास विदर्भाचा विकास होईल, असा विश्वास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed