Gold Silver price | सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ! आठवडाभरात सोनं कितीने महागलं; जाणून घ्या आजचे लेटेस्ट भाव

0
Gold-Silver-Rate-Today-26-November-2024.webp.webp


Gold Silver price | भारतात चालू आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. साप्ताहिक पातळीवर किमतीत मोठी वाढ झाली असली, तरी जागतिक बाजारातील नफावसुलीमुळे (Profit Booking) शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर आज, १७ मे २०२६ रोजी सोन्याचे दर काहीसे स्थिरावले आहेत.

या आठवड्यात २४ कॅरेट सोन्यात तब्बल ६,५४० रुपयांची, तर २२ कॅरेट सोन्यात ६,४७० रुपयांची साप्ताहिक वाढ नोंदवली गेली आहे. देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) आज रविवार, १७ मे रोजी देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सोन्याचे भाव खालीलप्रमाणे आहेत:

शहर २२    –     कॅरेट सोन्याचा भाव (₹)       २४-कॅरेट सोन्याचा भाव (₹)
दिल्ली                      ₹१,४४,०००                            ₹१,५७,०८०
मुंबई                        ₹१,४३,८५०                            ₹१,५६,९३०
पुणे                          ₹१,४३,८५०                             ₹१,५६,९३०
कोलकाता                 ₹१,४३,८५०                             ₹१,५६,९३०
बेंगळुरू                    ₹१,४३,८५०                              ₹१,५६,९३०
चेन्नई                         ₹१,४७,५००                             ₹१,६०,९१०

शुक्रवारी बाजारात झाली होती मोठी घसरण

साप्ताहिक वाढ सुरू असली तरी १५ मे (शुक्रवारी) दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याच्या भावात ३,२०० रुपयांची (१.९३%) मोठी घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या मोठ्या नफावसुलीमुळे सोने थेट १,६२,००० रुपयांवरून खाली आले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड ४,५४८.४६ डॉलर्स प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत आहे.

चांदीच्या दरातही मोठी चढ-उतार

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही या आठवड्यात ५,००० रुपयांची साप्ताहिक वाढ झाली आहे. मे रोजी सकाळी चांदीचा दर २,८०,००० रुपये प्रति किलो एवढा आहे. सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत शुक्रवारी चांदीच्या भावातही २१,६०० रुपयांची (७.३%) मोठी घसरण झाली होती, ज्यामुळे भाव २,७५,००० रुपयांपर्यंत खाली आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला (जानेवारीमध्ये) चांदीने ४ लाख रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता, मात्र त्यानंतर किमतीत बरीच घसरण झाली आहे. सध्या जागतिक बाजारात स्पॉट सिल्व्हर ७८.२१ डॉलर प्रति औंस वर आहे.

भू-राजकीय तणाव आणि चलनातील चढ-उतार पाहता आगामी काळातही मौल्यवान धातूंच्या किमतीत अशीच अस्थिरता राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

News Title: Gold Silver price Weekly Hike Rates Check City Wise May 17

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed